ICC Player of the Month: आयसीसीचा एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला? 'या' क्रिकेटपटूने मारली बाजी
आसीसीने नुकताच एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार (ICC Player of the Month) जाहीर केला आहे.
आसीसीने नुकताच एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार (ICC Player of the Month) जाहीर केला आहे. आसीसीने या महिन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि ऑस्ट्रेलिया संघाची विकेटकिपर एलिसा हीली (Alyssa Healy) या दोघांची निवड केली आहे. बाबर आझमने दक्षिण आप्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत जबरदस्त कामगिरी बजावली होती. तर, हिलीने न्यूझीलंडविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यात 51.66 च्या सरासरीने 155 धावा ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे देखील वाचा- टीम इंडियातील ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू आहेत ‘या’ पाच श्रीमंत कुटुंबांचे जावई
बाबर आझमने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 274 धावांचा पाठलाग करताना 26 वर्षीय बाबरने 103 करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही 94 धावा केल्या. त्याला या खेळीमुळे 13 रेंटिग गुण मिळाले आहेत. या गुणांसह त्याने भारताचा कर्णधानर विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. हे देखील वाचा- IPL मध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम Virat Kohli याच्या नावावर, जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
ट्विट-
तसेच, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात आक्रमक खेळी केली होती. या सामन्यात त्याने 59 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. बाबरच्या या कामगिरीवर आयसीसी अकादमीचे सदस्य रमीज राजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताकद किंवा हुशारी अशा दोन प्रकारे फलंदाजी केली जाते. बाबरने हुशारीने फलंदाजी केली. तो या पुरस्कारचा हक्कदार आहे, असेही ते म्हणाले आहे.