ICC World Cup 2019: क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील India vs Pak सामन्यावरुन पाकिस्तानच्या Jazz TV वर जाहिरात, विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वादग्रस्त पद्धतीने वापर

या सामन्याची तिकीटं अगोदरच पूर्ण बुक झालेली असतात. तसेच, दोन्ही देशांतील नागरिक हा एक देशप्रेम सिद्ध करण्याचा क्षण आहे असे मानून आपापल्या संघाप्रती जल्लोष करतात.

Prop being used by the Pakistani broadcaster to mock Wing Co. Abhinandan | (Photo Credits: YouTube Screengrab)

ICC World Cup 2019: क्रिकेट विश्वचषक 2019 साठी रविवारी (16 जून 2019) खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावरुन भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात सामन्यापूर्वीच जोरदार टशन पाहायला मिळत आहे. ही टशन दोन्ही देशांतील टीव्ही जाहीरातींमधून पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनलने एक जाहिरात प्रसारित केली आहे. ज्यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांच्याशी साधर्म्य असलेली व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानातील जाज टीव्ही (Jazz TV) या वहिणीवर ही जाहीरात प्रसारित करण्यात आली आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानने केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. सोशल मीडियावरही पाकिस्तानला या जाहिरातीवरुन ट्रोल केले आहे. भारतीय सैनिक असलेल्या अभिनंदन वर्धमान यांच्या प्रतिमेचा वापर प्रतिकात्मकरित्या वापरल्यावरुन पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

अभिनंद यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख असलेल्या मिशांना घेऊन या जाहीरातीवर भर देण्यात आला आहे. साधारण 33 सेंकंद इतका अवधी असलेल्या या जाहीरातीत अभिनंदन यांच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेली व्यक्ती प्लाईट सूटमध्ये नव्हे तर, भारतीय क्रिकेट टीमच्या निळ्या जर्सीत दाखवण्यात आली आहे. ही व्यक्ती हातात चहाचा कप घेऊन चहा पिताना दिसते. 27 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक केलेल्या टीव्ही क्लिपमध्ये खरेखुरे विंग कमांडर अभिनंदन असेच दिसले होते.

काय आहे जाहीरातीत?

दरम्यान, विंग कमांडर यांच्याप्रमाणे मिशी असलेली व्यक्ती जाहिरातीत दिसते. या व्यक्तिला अनेक प्रश्न विचारण्यात येतात. ज्या प्रश्नांची उत्तरे कमांडर यांच्याशी साधर्म्य असलेली ही व्यक्ती देत नाही. मात्र, चहा कसा आहे विचारतातच चहा छान आहे असे ही व्यक्ती सांगते. प्रश्न विचारणारा अधिकारी सांगतो की, ठिक आहे. आपण जाऊ शकतो. ती व्यक्ती जायला निकते. इतक्यात त्या व्यक्तिला आडवण्यात येते आणि त्याच्या हातातील कप हिसकाऊन घेण्यात येतो. तो अधिकारी म्हणतो 'कप काहां लेके जा रहे हो'. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये होत असलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमिवर ही जाहीरात करण्यात आली आहे. (हेही वाचा, ICC World Cup 2019: Team India ला मोठा धक्का, शिखर धवन दुखपतीने भारतीय संघातुन बाहेर)

ट्विट

जाहिरातीमधील डायलॉग

(हे सर्व डायलॉग भारत पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याच्या पार्श्वभूमिवर आहेत.)

पाकिस्तानी अधिकारी - प्लेइंग इलेवन में कौन शामिल हैं।

अभिनंदनशी साधर्म्य असलेली व्यक्ती- "मैं आपको यह बताने वाला नहीं हूँ"

पाकिस्तानी अधिकारी - "चाय कैसी है?"

अभिनंदनशी साधर्म्य असलेली व्यक्ती- "चाय फॅण्टॅस्टीक"

पाकिस्तानी अधिकारी - "अचला चलो, तुम छोड़ सकते हो।"

(इथे अभिनंदनशी साधर्म्य असलेली व्यक्ती उठून जाऊ लागते. इतक्यात चौकशी करणारी ती व्यक्ती अभिनंदनशी साधर्म्य असलेली व्यक्तीला रोखते आणि म्हणते रूको! कप काहन लेके जा रहौ हो?")

क्रिकेट वर्ल्डकप आणि त्यातही भारत - पाकिस्तान सामना या दोन्ही गोष्टी जगभरात उत्सुकतेचा विषय असतात. या सामन्याची तिकीटं अगोदरच पूर्ण बुक झालेली असतात. तसेच, दोन्ही देशांतील नागरिक हा एक देशप्रेम सिद्ध करण्याचा क्षण आहे असे मानून आपापल्या संघाप्रती जल्लोष करतात.