पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हकवर अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप, ट्विटरवर WhatsApp चॅट स्क्रीन शॉट वायरल
त्याच्यावर मुलींशी अनैतिक संबंध आणि त्यांची फसवणूक करण्याचा आरोप आहे.
पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) यांचा भाचा इमाम उल हक (Imam ul Haq) हे नव्या संकटात फसला आहे. त्याच्यावर मुलींशी अनैतिक संबंध आणि त्यांची फसवणूक करण्याचा आरोप आहे. ट्विटरवरील एका यूजरने काही मुलींच्या चॅटचे स्क्रीन शॉट शेअर केली, ज्यात असे म्हटले आहे की इमामचा अनेक मुलींशी अनैतिक संबंध आहेत. लीक झालेल्या चॅटमध्ये, पाकिस्तानचा सलामीवीर एका मुलीशी बोलतोय बोलताना दिसतोय. इथे इमाम विवाह करण्यास नकार देताना दिसतोय. काही चॅट्समध्ये इमाम मुलीला "बेबी" म्हणत आहे. तर दुसऱ्या चॅटमध्ये एका मुलीशी संबंध तोडताना दिसतोय. तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही लीक चॅटची औपचारिक पुष्टी करत नाही.
दरम्यान, याबाबत पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड किंवा इमामकडून कोणतेही विधान केले गेले नाही. काही रिपोर्ट्सप्रमाणे, या सर्व घटनांचा गेल्या 6 महिन्यांमध्ये घडल्या आहेत. यापैकी काही संभाषणे विश्वचषकदरम्यान असल्याचा दावा केला जात आहे. या चॅट शेअर करणारा म्हणाला की इमामने या मुलींचा फायदा उचलला आहे. शिवाय त्याने दावा सखील केला आहे की त्याच्याकडे या प्रकरणात पुरेशी फोटोज आणि व्हिडिओ आहे. आणि जेव्हा या मुली म्हणतील तेव्हा तो पोस्ट शेअर करेल. हे चॅट्स सोशल मीडियावर वायरल होताच यूजर्सने आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी त्याचा बचाव केला तर काहींनी त्याला धारेवरच धरले.
स्त्रिया या कोणतीही गोष्टी नाहीत आणि त्यांना त्या पद्धतीने वागू नयेत.
खात्रीने काहीही सांगितले जाऊ शकत नाही.
इमाम उल हकने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, इमामने 19 डावांत 47.5 च्या स्ट्राइक रेटने 483 धावा केल्या आहेत. इमामने टेस्ट क्रिकेटमध्ये ३ अर्धशतक ठोकली आहे. दरम्यान, हे पहिल्यांदा नाही की एक पाकिस्तानी क्रिकेटपटू अशा वादात अडकला आहे. याआधी माजी पाक खेळाडू अब्दुल रझ्झाक याने देखील एका टीव्ही शो दरम्यान खळबळजनक वक्तव्य केले होते. यात त्याने आपले विवाहबाह्या संबंधांचा खुलासा केला होता.