IPL Auction 2025 Live

Pakistan A Beat United Arab Emirates, 11th Match Scorecard: पाकिस्तान अ संघाने यूएईचा 114 धावांनी केला पराभव, शाहनवाज दहनी यांनी 5 विकेट घेत यूएईच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 48 धावांवर संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.

Pakistan A National Cricket Team vs United Arab Emirates National Cricket Team, ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Match Scorecard:  ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप 2024 (ACC Mens T20 Emerging Teams Asia Cup 2024 ) चा 11 वा सामना आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना ओमानमधील अल अमेरत क्रिकेट ग्राउंड (मिनिस्ट्री टर्फ 1), अल अमेरत (Al Amerat Cricket Ground (Ministry Turf 1), Al Amerat)  येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान अ संघाने संयुक्त अरब अमिरातीचा 114 धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तान अ संघाचे कर्णधारपद मोहम्मद हरिसच्या खांद्यावर आहे. तर संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व राहुल चोप्रा करत आहे.  (हेही वाचा - IND A vs OMN, Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Live Streaming: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज भारत अ आणि ओमान आमनेसामने, पहा येथे सर्वोत्तम ड्रीम 11 संघ  )

या सामन्यात पाकिस्तान अ संघाचा कर्णधार मोहम्मद हरिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 48 धावांवर संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तान अ संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 179 धावा केल्या. पाकिस्तान अ संघासाठी कर्णधार मोहम्मद हरिसने सर्वाधिक नाबाद 71 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान मोहम्मद हरिसने 49 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. मोहम्मद हरिसशिवाय यासिर खानने 25 धावा केल्या.

मुहम्मद फारुखने यूएई संघाला पहिले यश मिळवून दिले. यूएईकडून महंमद फारुखने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी UAE संघाला 20 षटकात 180 धावा करायच्या होत्या. यूएईचा संपूर्ण संघ 16.3 षटकात अवघ्या 65 धावांत गारद झाला. यूएई संघाकडून कर्णधार राहुल चोप्राने सर्वाधिक 20 धावांची खेळी खेळली.

राहुल चोप्राशिवाय तनिश सुरीने 15 धावा केल्या. पाकिस्तान अ संघाला शाहनवाज दहानीने पहिले यश मिळवून दिले. पाकिस्तान अ संघाकडून शाहनवाज दहानीने सर्वाधिक ५ बळी घेतले. शाहनवाज डहानीशिवाय सुफियान मुकीमने 2, अब्बास आफ्रिदी आणि अराफत मिन्हासने प्रत्येकी एक विकेट घेतली.