PAK vs BAN, Ticket Prize: बांगलादेश - पाकिस्तानच्या सामन्याच्या तिकिटाची किंमत पाहून सर्वच हैराण; वडापाव पेक्षा कमी पैशात पाहता येणार सामना
हा सामना पाचही दिवस पाहायचा असेल, तर हे तिकीट अवघे 215 रुपये इतके असणार आहे. म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम केवळ 72 रुपये इतकी आहे.
बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) असून दोन्ही संघामध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. हा कसोटी सामना रावलपिंडीच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी झालेल्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super Leage) स्पर्धेत सामना पाहण्यासाठी प्रेक्षकच नव्हते. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत प्रेक्षकांना मैदानात खेचून आणण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनोखी शक्कल लढवली आहे. (हेही वाचा - Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक की निराशा, आज होणार निर्णय)
भारतात होणाऱ्या सामन्यांची तिकीटं अवघ्या काही मिनिटात विकली जातात तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने असले की, स्टेडियम रिकामेच असतात. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील फायनल आणि एलिमिनेटरच्या सामन्यावेळीही स्टेडियम रिकामे होते. आता स्टेडियम भरुन काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तिकिटांची किंमत कमी केली आहे. हा सामना क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 50 रुपयात (भारतीय चलनात 15 रुपये) पाहता येणार आहे. हा सामना पाचही दिवस पाहायचा असेल, तर हे तिकीट अवघे 215 रुपये इतके असणार आहे. म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम केवळ 72 रुपये इतकी आहे.
पाहा दोन्ही संघ
पाकिस्तान - शान मसूद (कर्णधार), सऊद शकील (उप कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आमिर जमाल, अबरार अहमद, बाबर आझम, खुर्रम शहजाद,मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मीर हमजा, कामरान गुलाम, मोहम्मद अली, नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक) शाहीन शाह आफ्रिदी.
बांग्लादेश - नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकिर हसन, महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम,शाकिब अल हसनतेजुल इस्लाम,लिट्टन कुमार दास, मेहदी हसन मिराज, नईम हसन, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सेय्यद खालिद अहमद
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)