PAK vs AUS: लाहोर कसोटीत Pat Cummins याची कमाल, अशी कामगिरी करणारा Ashwin नंतरचा ठरला दुसरा खेळाडू; पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

कमिन्सने लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या, तर हसन अली याला बाद करून कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आपले 100 बळी पूर्ण केले.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

PAK vs AUS 3rd Test: लाहोर (Lahore) येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि त्याच्या सहकारी वेगवान गोलंदाजांनी अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण सामना फिरवला. आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असलेल्या पाकिस्तान संघाचा डाव 268 धावांवर आटोपला. कमिन्सने लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या, तर सहकारी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 4 विकेट्स घेतल्या. कमिन्सने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याला बाद करून कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) आपले 100 बळी पूर्ण केले तसेच आशियात प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेतल्या. (ICC Test Rankings: बाबर आजम प्रथमच फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये; रवींद्र जडेजा पुन्हा नंबर 1 सिंहासनावर विराजमान)

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करणारा कमिन्स हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी भारत आणि श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यानेही कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या 100 बळी पूर्ण केले होते. दोन्ही गोलंदाजांनी विकेटचे शतक पूर्ण करण्यासाठी 21 कसोटी खेळले. अश्विनने 47 च्या स्ट्राइक रेटने 100 बळी पूर्ण केले होते, तर कमिन्सने 21 कसोटी सामन्यांमध्ये 46 च्या स्ट्राईक रेटने विकेट्सचे शतक पूर्ण केले आहे. याशिवाय आता पॅट कमिन्स 200 कसोटी विकेट्सच्या टप्प्यापासून फक्त 6 विकेट दूर आहे. तसेच कमिन्सने पाहुण्या कर्णधारने नोंदवलेली सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारीची नोंद केली. कमिन्सने 56 धावा देऊन 5 गडी बाद केले आणि 1955 मध्ये भारताचे महान विनू मांकड यांच्या 5/64 विक्रमाला मागे टाकले.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पाकिस्तानविरुद्ध लाहोर कसोटीत आपल्या जबरदस्त वेगवान गोलंदाजीने संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कमिन्सने मिचेल स्टार्कच्या साथीने 10 षटकांत ऑस्ट्रेलियाचे 9 विकेट घेतल्या. कमिन्सने लाहोर कसोटीच्या पहिल्या डावापर्यंत पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर यांनी पाकिस्तानवर 134 धावांच्या आघाडीसह मजबूत स्थितीत पोहचवले. अशा परिस्थितीत 2 दशकांहून अधिक काळातील पहिल्या पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी मालिका जिंकण्यासाठी प्रयन्तशील असेल. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif