PAK vs AUS 2nd Test: स्टार खेळाडूला बाहेर करून कराची टेस्ट साठी ऑस्ट्रेलिया ताफ्यात नव्या खेळाडूचे आगमन, शेन वॉर्न कडून घेतले आहेत गोलंदाजीचे धडे
ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने पुष्टी केली आहे की लेगस्पिनर मिचेल स्वेपसन (Mitchell Swepson) पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणार आहे. स्वीपसन दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न याला बघून मोठा झाला आहे.
PAK vs AUS 2nd Test: रावळपिंडी (Rawalpindi) येथील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यावर पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 12 मार्चपासून कराची (Karachi) येथे दुसरा सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आता कराची कसोटी जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले असून यासाठी त्यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनची धाडसी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने पुष्टी केली आहे की लेगस्पिनर मिचेल स्वेपसन (Mitchell Swepson) पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणार आहे. स्वेपसनला अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) याच्या जागी संघात एन्ट्री मिळाली आहे. स्वीपसन अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनला कराची खेळपट्टीवर साथ देईल जिथे भरपूर फिरकी गोलंदाजांना वळण मिळणे अपेक्षित आहे.
मिशेल स्वीपसन दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न याला बघून मोठा झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील लेग-स्पिन गोलंदाजीचा सर्वात मोठा चॅम्पियन वॉर्नचा स्वीपसनच्या कारकिर्दीवर मोठा प्रभाव राहिला आहे. फिरकी दिग्गजने स्वीपसनला त्याच्या कारकिर्दीत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन केले, रणनीतिक आणि तांत्रिक टिप्स दिल्या. पण सर्वात उल्लेखनीय म्हणजे 2017-18 मध्ये वॉर्नने त्याला क्रीजकडे जाण्याचा दृष्टीकोन सुधारण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला कराची खेळपट्टीवर हेझलवूडच्या अनुभवाची नाही, तर लायनचा भार कमी करू शकणाऱ्या अतिरिक्त फिरकी गोलंदाजाची गरज आहे. आणि खेळपट्टीवर पडलेल्या भेगांचा फायदा घेत तो पाकिस्तानवर दबाव आणू शकतो. अशा परिस्थितीत आता स्वेपसन ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहे. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय 2009 मध्ये ब्राइस मॅकगेननंतर कसोटी क्रिकेट खेळणारा स्वीपसन ऑस्ट्रेलियाचा पहिला स्पेशलिस्ट लेगस्पिनर ठरला आहे.
दुसरीकडे, कराची कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात एक एकमेव बदल कर्णधार कमिन्सने केला आहे. याशिवाय संघाचा फलंदाजीचा क्रमही कराचीमध्ये रावळपिंडीत राहील. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीची जबाबदारी सांभाळतील. तर मधल्या फळीत लाबूशेन, स्मिथ, हेड फटकेबाजी करताना दिसतील. याशिवाय संघाकडे कॅमरून ग्रीनच्या रूपात एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये पर्याय आहे. तर अॅलेक्स कॅरी विकेटकीपरच्या भूमिकेत दिसेल.
कराची कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI: पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, आणि मिचेल स्वेपसन.