Hardik Pandya Fined: एक चूक हार्दिक पांड्याला पडली महागात, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर ठोठावला लाखोंचा दंड
या सामन्यात ओव्हर रेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्सचा संघ खूपच संथ होता, त्यामुळे त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दंड ठोठावण्यात आला आहे.
PBKS vs MI: पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्लो ओव्हर रेटसाठी दंडाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई संघाने आयपीएलच्या 17 व्या हंगामात पंजाब संघाविरुद्ध आपला 7 वा सामना खेळला ज्यात त्यांनी 9 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात ओव्हर रेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्सचा संघ खूपच संथ होता, त्यामुळे त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार म्हणून हार्दिकला या मोसमाच्या सुरुवातीला स्लो ओव्हर रेटमुळे दंडाला सामोरे जावे लागले आहे. (हे देखील वाचा: LSG vs CSK, IPL 2024 34th Match: लखनौ आणि चेन्नई यांच्यात होणार आज हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर)
12 लाखांचा दंड ठोठावला
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा ओव्हर रेट खूपच संथ होता, ज्यामध्ये डावाच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये त्यांना 30 यार्डच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षकांऐवजी फक्त 4 क्षेत्ररक्षक उभे करता आले. हार्दिकला बीसीसीआयने 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ज्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मोसमात कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच चूक आहे, त्यामुळे केवळ 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सने या मोसमात दुसऱ्यांदा ही चूक केल्यास हार्दिकला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल, तर संघातील उर्वरित खेळाडूंनाही दंड भरावा लागेल.
हार्दिक पांड्याची खराब कामगिरी
या मोसमात खराब कर्णधारामुळे हार्दिक पांड्याला आतापर्यंत टीकेला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूने छाप पाडण्यात अपयशी ठरला. या सामन्यात फलंदाजी करताना हार्दिकने 6 चेंडूत फक्त 10 धावा केल्या, तर गोलंदाजीत त्याने 4 षटके टाकली पण 33 धावा केल्या आणि फक्त 1 बळी घेण्यात यश आले.