On This Day in 2010: सचिन तेंडुलकर यांनी आजच्या दिवशी रचला होता विक्रम; एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा ठरला होता पहिला खेळाडू
सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या कारकिर्दित अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना क्रिकेट देव म्हणून संबोधले जाते. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या कारकिर्दित अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. परंतु, जागतिक क्रिकेट, भारतीय क्रिकेट, भारतीय चाहत्यांसह सचिन तेंडुलकर यांच्यासाठी 24 फेब्रुवारी ही तारीख खूप खास आहे. सचिन तेंडुलकर यांनी आजच्या दिवशी 2010 मध्ये ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 200 धावा (Double Century) केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारे सचिन तेंडुलकर पहिले फलंदाज ठरले होते.
पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा पहिला मान सचिन तेंडुलकर यांना मिळाला. दक्षिण अफ्रिका विरुद्ध खेळण्यात आलेल्य त्या एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकर यांनी 147 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या होत्या. यात 25 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सचिनने द्विशतक करताच ग्वालियलमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला होता. हे देखील वाचा- IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी विराट कोहलीची इंग्लंडला चेतावणी, म्हणाला- 'इंग्लंडमध्येही कमकुवतपणा, आमचे गोलंदाज भारी पडतील'
बीसीसीआयचे ट्विट-
सचिन तेंडूलकर यांच्या द्विशतक कामगिरीनंतर भारताच्या अन्य दोन खेळाडूने ही कामगिरी करून दाखवली आहे. यात माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. वीरेद्र सेहवान यांनी 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने तीन वेळा द्विशतक ठोकले आहे. तसेच एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 264 धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.