On This Day in 2019: आजच्या दिवशी मुंबई इंडियन्स चौथ्यांदा बनला आयपीएल किंग, थरारक सामन्यात CSK ला चारली पराभवाची धूळ
मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 12 मे, 2019 रोजी त्यांनी त्यांनी आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकले. फायनल सामन्यात मुंबईसमोर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान होते. अंतिम सामन्यात मुंबईने फक्त 1 धावाने पराभूत करत तिसऱ्यांदा चेन्नईला पराभवाची धूळ चारली.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 12 मे, 2019 रोजी त्यांनी त्यांनी आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकले. फायनल सामन्यात मुंबईसमोर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) आव्हान होते. दोन्ही टीम चौथे जेतेपद जिंकून टूर्नामेंटमधील सर्वात यशस्वी टीम बनण्यासाठी स्पर्धा होती. आजच्या दिवशी प्रेक्षकांना 2019 मध्ये दोन्ही टीममध्ये अगदी थरारक अंतिम चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात यापूर्वी मुंबईने आतापर्यंत चार फायनल खेळले असून त्यापैकी दोन विजेतेपदासाठी (2013 आणि 2015) त्यांनी चेन्नईचा पराभव केला होते. चेन्नई सुपर किंग्सचा हा आठवा अंतिम सामना होता. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात मुंबईने फक्त 1 धावाने पराभूत करत तिसऱ्यांदा चेन्नईला पराभवाची धूळ चारली. किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद 41 धावा केल्या. मुंबईने पहिले फलंदाजी करत 8 विकेट गमावून 149 धावा केल्या. या नंतर शेन वॉटसनच्या 80 धावांच्या खेळी नंतरही चेन्नई 7 विकेट गमावून 148 धावाच करू शकला. ('मॅच फिक्सिंग माफियाच्या तारा भारताशी जोडलेल्या आहेत', माजी पाकिस्तानी गोलंदाज अकीब जावेदचा खळबळजनक आरोप)
चेन्नई संघासाठी वॉटसनने 59 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले परंतु संघासाठी विजय मिळवू शकला नाही. सामनावीर ठरलेला मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 14 धावा देत 2 गडी बाद केले. त्याच्या व्यतिरिक्त क्रुणाल पंड्या, लसिथ मलिंगा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. शेवटच्या बॉलवर चेन्नईला विजयासाठी 2 धावांची आवश्यकता होती. मलिंगाने शार्दूल ठाकूरला एलबीडब्ल्यू आऊट करून मुंबईला चौथे जेतेपद मिळवून दिले. यासह मुंबईने पुन्हा एकदा चेन्नईला अंतिम फेरी जिंकण्यास रोखले. चेन्नई आणि मुंबई हे चौथ्यांदा फायनल खेळत होते, त्यापैकी मुंबईने तीन वेळा विजय मिळविला आहे.
तत्पूर्वी, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करून मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईने 89 धावांवर चार विकेट गमावल्या. पोलार्डने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंमध्ये दोन चौकार ठोकले. चेन्नईकडून दीपक चहरने 3 गडी तर शार्दुल ठाकूर आणि इमरान ताहिर यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)