On This Day in 2013: सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी 200वा टेस्ट खेळून क्रिकेटल दिला भावुक निरोप, वानखेडे स्टेडियममध्ये झाला 'सचिन... सचिन...'चा जयघोष
16 नोव्हेंबर, 2013 म्हणजे आजच्या दिवशी 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तो दिवस फक्त सचिनच नाही तर त्याच्या चाहत्यांसाठीही भावुक दिवस होता. क्रिकेटवेड्या फॅन्सनं खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर कारकिर्दीतील 200 वी टेस्ट मॅच खेळण्यासाठी सचिन मैदानावर उतरताच स्टेडियमभर 'सचिन...सचिन...'चा जयघोष सुरु झाला.
16 नोव्हेंबर, 2013 म्हणजे आजच्या दिवशी 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachinn Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तो दिवस फक्त सचिनच नाही तर त्याच्या चाहत्यांसाठीही भावुक दिवस होता. 2012 मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिनने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) अंतिम सामना खेळला. क्रिकेटवेड्या फॅन्सनं खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध कारकिर्दीतील 200वी टेस्ट मॅच (Sachin 200th Test) खेळण्यासाठी सचिन मैदानावर उतरताच स्टेडियमभर 'सचिन...सचिन...'चा जयघोष सुरु झाला. त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात सचिनने 74 धावांची खेळी केली होती. जर तुम्हाला तो दिवस आठवत असेल तर वेस्ट इंडीजच्या कोणत्याही खेळाडूने सचिनला बाद केल्यानंतर उत्सव साजरा केला नव्हता कारण असे करत त्यांनी स्वतःच्या पद्धतीने क्रिकेटच्या महान दिग्गज व्यक्तीचा सन्मान केला. (On This Day in 1989: सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठेवले पहिले पाऊल, मास्टर-ब्लास्टरला BCCIने म्हणाले थँक यू!)
आपल्या अंतिम सामन्यानंतर सचिनने स्टेडियममध्ये उपस्थित त्याचे सहकारी खेळाडू, कुटुंब, मित्र आणि प्रेक्षकांना संबोधित करत आभार मानले. सचिनसाठी तो अत्यंत भावुक क्षण होता. त्याने आपल्या भाषणात संपूर्ण क्रिकेटींग आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आणि ज्यांनी त्याच्या आयुष्यात काही प्रमाणात योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानले. सचिन म्हणाला होता, "वेळ बर्याच वेगाने बदलला आहे. मैदानात क्रिकेट खेळत मला दोन दशक झालं कळलंच नाही. मला खूप आठवणी दिल्या आहेत ज्यांना मी आयुष्यभर सांभाळेन." सचिन म्हणाला की, "विशेषतः स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीतून सचिन-सचिनचा आवाज माझ्या कानात ऐकू येईल जोपर्यंत माझा अखेरचं श्वास आहे." त्यादिवशी सचिनच्या शब्दांनी कोट्यावधी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले.
1989 मध्ये अवघ्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. त्याने एकच टी-20 सामना खेळला असून त्यात तो फारसा यशस्वी झाला नाही, पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून त्याच्या नावावर एकूण 34,757 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 18,426 धावा तर कसोटी स्वरूपात त्याने 15,291 धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा पहिला आणि आजवर एकमेव खेळाडू आहे. शिवाय, सचिनने पुरुष क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक ठोकले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)