On This Day in 2002: भारतातील अपमानाचा टीम इंडियाने इंग्लंडमध्ये घेतला बदला, नेटवेस्ट फायनल विजयानंतर दादाने जर्सी उतरवत केला जल्लोष, पाहा संस्मरणीय क्षण
युवा युवराज सिंग आणि मोहम्मद कैफची मॅच-विनिंग कामगिरी आणि त्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या ‘दादा’ सौरव गांगुलीने आपली जर्सी उतरवत केलेला जल्लोष आजही अद्यापही भारतीय क्रिकेटमधील एक संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे.
NatWest Series 2002 Final: भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) संघातील 2002 नेटवेस्ट सिरीजचा फायनल (NatWest Series FinaL) सामन्याचे दृश्य आजही अनेक क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत खूप ताजे आहेत. युवा युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफची (Mohammad Kaif) मॅच-विनिंग कामगिरी आणि त्यानंतर ‘लॉर्ड्स’च्या (Lords) बाल्कनीत उभ्या असलेल्या ‘दादा’ सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आपली जर्सी उतरवत केलेला जल्लोष आजही अद्यापही भारतीय क्रिकेटमधील एक संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. आज त्या ऐतिहासिक विजयाला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. इंग्लंडने मार्कस ट्रेस्कोथिकच्या 109 आणि कर्णधार नासीर हुसेनच्या 115 धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 325 धावा केल्या. त्या वेळी 300 पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नव्हते. इंग्लंडचा डाव पाहूनच भारतीय चाहते निराश झाले कारण याआधी चार-पाच फायनल्समध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब होती.परंतु, वीरेंद्र सेहवाग आणि कर्णधार गांगुलीने 106 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. (On This Day in 2019: वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची शेवटची मॅच ठरली MS Dhoni याचीही अखेरची, आजच्या दिवशी तुटली होती लाखो क्रिकेटप्रेमींची मने)
मात्र, भारतीय संघ चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही आणि पाहताच धावसंख्या 146/5 अशी झाली. सचिन तेंडुलकर (14), राहुल द्रविड (5), दिनेश मोंगिया (9) आणि वीरू देखील बाद होऊन पॅवेलियनमध्ये परतले. यापूर्वी अॅलेक्स ट्यूडरने गांगुलीला पॅव्हिलियनमध्ये धाडले होते. टीम इंडियाच्या हातून हा सामना निसटताना दिसत असताना युवी आणि काऑ मैदानात आले. दोघांनी विकेट्सदरम्यान चांगलीच कामगिरी केली आणि चहुबाजूने शॉट्स खेळत धावा लुटल्या. भारतीय ड्रेसिंग रूम आणि क्रिकेट चाहत्यांचा उत्साह परतला. युवी-कैफूने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, युवीने कॉलिंगवूडच्या चेंडूवर ट्यूडरकडे झेलबाद झाला. त्यानंतर कैफला हरभजन सिंहने (15) साथ दिली व दोघांनी सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. अखेरीस झहीर खानने अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफला हलक्या हाताने शॉट खेळत धाव घेतली. या चेंडूवर टीम इंडियाला ओव्हर-थ्रो मिळाला आणि भारतीय फलंदाजांनी दुसरा धावा काढून इतिहास रचला. नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला.
नेटवेस्ट मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता जेव्हा इंग्लंडने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर थरारक पाचवा सामना जिंकला आणि अँड्र्यू फ्लिंटॉफने त्याचा टीशर्ट काढून जल्लोषात विजय साजरा केला आणि वानखेडे स्टेडियमभोवती चक्कर मारली. त्यानंतर फ्लिंटॉफला उत्तर देण्याची संधी गांगुली शोधत होता आणि त्यादिवशी ती संधी दादाकडे चालून आली ज्याचा त्याने पुरेपूर फायदा करून घेतला. यासह भारतीय संघाने भारतात झालेल्या पराभवाचा बरोबर बदला घेतला.