On This Day, February 7, 1999! आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी अनिल कुंबळे याने घेतले होते परफेक्ट 10, पाकिस्तानविरुद्ध स्वबळावर मिळवून दिला होता विजय

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी 7 फेब्रुवारी हा न विसरण्यासारखा दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी 1999 मध्ये आजच्याच दिवशी फिरकीचा जादूगार अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद केले होते. आणि ही कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील फक्त दुसरा गोलंदाज होता.

पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट घेतल्यावर अनिल कुंबळे (Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांसाठी 7 फेब्रुवारी हा न विसरण्यासारखा दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी 1999 मध्ये आजच्याच दिवशी फिरकीचा जादूगार अनिल कुंबळे (Anil Kumble) याने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद केले होते. आणि ही कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील फक्त दुसरा गोलंदाज होता. महत्वाचे म्हणजे ही कामगिरी आजवर फक्त फोन फिरकी गोलंदाजांनी केली आहे. कुंबळेपुर्वी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जिम लेकर याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1956 मँचेस्टर कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 गडी बाद केले होते. दिल्लीच्या तेव्हा फिरोजशाह कोटला स्टेडियमवर कुंबळेने 4 ते 7 फेब्रुवारी 1999 दरम्यान झालेल्या सामन्यात एका डावात डावात 26.3 ओव्हरमध्ये 9 मेडन ओव्हरसह 74 धावांवर सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘Broken Jaw’ च्या उदाहरणातून दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा; 'जम्बो' अनिल कुंबळे यांनी मानले आभार)

टीम इंडियाने दिलेल्या 420 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून सलामी जोडी सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदी 101 धावांची भागीदारी केली, पण कुंबळेच्या घटक गोलंदाजीमुळे सर्व पाकिस्तानी संघ 207 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने पाकिस्तानवर 212 धावांनी धुव्वा उडवला. कुंबळेने पहिले आफ्रिदीला बाद केले व त्यानंतर सर्व विकेट घेतल्या. जेव्हा कुंबळेने 9 गडी बाद केले तेव्हा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने जवागल श्रीनाथला ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्यास सांगितले, जेणेकरून त्याला नव्हे तर कुंबळेला शेवटची विकेट मिळो.

कुंबळेच्या या ऐतिहासिक कामगिरीचा व्हिडिओ पाहा

1990 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कुंबळे हा जगातील एक महान गोलांजांपैकी एक आहे. कुंबळे आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.  कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 956 विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. एवढेच नव्हे तरआंतरराष्ट्रीय वनडे आणि टेस्टमधेही भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने कसोटीमध्ये 619 आणि वनडे सामन्यात 337 विकेट्स घेतल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement