On This Day in 1983: 37 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत बनला होता विश्वविजेता, कपिल देवच्या टीम इंडियाने रचला होता इतिहास

'क्रिकेटचा मक्का' म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा विश्वविजेता बनला आणि त्यांणात भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलून गेले.

कपिल देव 1983 विश्वचषक (Photo Credit: Twitter/ICC)

आजपासून फक्त 37 वर्षांपूर्वी 25 जून 1983 रोजी भारतीय संघाने (Indian Team) आपला पहिला विश्वचषक (World Cup) जिंकला होता. 'क्रिकेटचा मक्का' म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानात कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा विश्वविजेता बनला आणि त्यांणात भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलून गेले. 1983 च्या 'त्या' अखेरच्या सामन्यात भारताने दोन वर्ल्ड कप विजेता वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव केला होता. त्यानंतर आता 37 वर्षे उलटून गेली आहेत पण कपिलच्या चेह्र्यावरचं हास्य आणि हातात धरलेला वर्ल्ड कप चाहत्यांना अजूनही आठवत आहे. अंतिम सामन्यात भारत फक्त 183 धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यामुळे खेळाडूंसोबत चाहत्यांनाही त्यांच्या विजयाची आशा नव्हती. मात्र, कपिल यांनी कुशल नेतृत्व आणि टीमने आपल्या खेळाने पराभवाच्या तोंडून विजय खेचून आणला. दर चार वर्षांनी, विश्वचषकदरम्यान, तो देखावा टीव्हीवर वारंवार दिसतो. त्यानंतर एप्रिलमध्ये वानखेडे स्टेडियमवर पुन्हा वर्ल्ड कप सुरू होता तेव्हा भारताला विजेतेपदासाठी 28 वर्षांची मोठी प्रतीक्षा करावी लागली. (On This Day in 1983: आजच्या दिवशी कपिल देव यांनी भारताकडून पुरुष वर्ल्ड कपमध्ये झळकावले होते पहिले वनडे शतक, झिम्बाब्वेविरुद्ध खेळला 175 धावांचा शानदार डाव)

इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे झालेल्या 1983 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडीजच्या मजबूत संघाला 43 धावांनी पराभूत केले. 183 सारख्या छोट्या स्कोरवर ऑलआऊट झाल्यावरही कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजला 140 धावांवर ऑलआऊट केले आणि विश्वचषकमध्ये त्यांचे अधिराज्य गाजवले. कपिल देव, संदीप पाटील, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी यांनी वैयक्तिकरित्या स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी केली. 1983 विश्वचषक विजय भारतीय क्रिकेटसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. ज्यांनी भारताचा हा विजय पाहिला आणि ‘रात्री उशिरापर्यंत साजरा’ केला त्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सामील होते.

विशेष म्हणजे, 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रत्येक सदस्याला बीसीसीआयने दोन कोटी रुपये दिले होते, परंतु 1983 विश्वचषक विजेते इतके भाग्यवान नव्हते. तेव्हा बोर्डाने भारताला फायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येकाला 25,000 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला होता.