Gudi Padwa 2021: गुढीपाडवा निमित्त रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादवसह मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूंनी दिल्या मराठीतून शुभेच्छा; पाहा व्हिडिओ

मराठी लोकांसाठी ही नवीन वर्षाती सुरूवात असते, आज सगळे नवीन वर्षांची नवीन धोरणे ठरवतात.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

गुढीपाडवा (Gudi Padwa 2021) हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी लोकांसाठी ही नवीन वर्षाती सुरूवात असते, आज सगळे नवीन वर्षांची नवीन धोरणे ठरवतात. या दिवशी व्यवसाय प्रारंभ, नवीन वस्तू खरेदी, ,सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दरम्यान, कोरोना महामारीमुळे हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. या निमित्ताने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनीही त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे,  खेळाडूंनी या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने गुढीपाडवा निमित्त त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अर्जुन तेंडुलकर, रोहित शर्मा, आदित्य तरे, धवल कुलकर्णी यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch KKR Vs MI IPL 2021 Match 5: कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईत इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभव केला होता. महत्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्सने सलग 9 हंगामातील पहिला सामना गमवला आहे. त्यानंतर आज मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट राईडर्स सोबत भिडणार आहे.