Oman vs Nepal 2nd T20 2024 Scorecard: नेपाळचा ओमानवर 37 धावांनी विजय, गुलसन झा ठरला सामन्याचा हिरो

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळ संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा केल्या.

Oman vs Nepal (Photo: @TheOmanCricket/@CricketNep)

Oman National Cricket Team vs Nepal National Cricket Team 2nd T20 Tri-Series 2024 Scorecard:  ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील T20 तिरंगी मालिका 2024 चा दुसरा सामना किंग सिटी येथील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात नेपाळने ओमानचा 37 धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला. या सामन्यात नेपाळकडून करण केसीने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय गुलसन झा याने बॅट आणि बॉल या दोन्हीत चमत्कार दाखवले. गुलसन झाने 40 धावा केल्या. तर गोलंदाजीतही दोन बळी घेतले.  (हेही वाचा -  IND vs BAN 2nd Test: तीन दिवसांचा खेळ वाया, तरीही भारतीय संघ जिंकू शकतो कानपूर कसोटी? समजून घ्या समीकरण)

याआधी दुसऱ्या टी-20 सामन्यात ओमानचा कर्णधार आकिब इलियासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळ संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा केल्या. नेपाळ संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. नेपाळसाठी गुलसन झा याने शानदार फलंदाजी करत अवघ्या 17 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 40 धावा केल्या. गुलसन झा व्यतिरिक्त कुशल मल्लाने 30 धावा केल्या. झिशान मकसूदने ओमानच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. ओमानकडून कर्णधार आकिब इलियासने सर्वाधिक तीन बळी घेतले. आकिब इलियासशिवाय शकील अहमद, फैयाज बट आणि जीशान मकसूद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

177 धावांच्या प्रत्युत्तरात ओमानचा संघ 19.1 षटकात 139 धावांवर गारद झाला. ओमानकडून शोएब खानने सर्वाधिक ४५ धावा केल्या. याशिवाय रफिउल्लाहने 33 धावांचे योगदान दिले. तर नेपाळकडून गोलंदाजीत करण केसीने 4 षटकात 36 धावा देत सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय गुलसन झा याने दोन गडी बाद केले.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif