NZ vs WI 1st T20I Live Streaming: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतात कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
NZ vs WI 1st T20I Live Streaming: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट टीममध्ये 27 नोव्हेंबर 2020 रोजी ऑकलंडच्या इडन पार्क येथे पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. दुर्दैवाने, भारतातील चाहत्यांना टीव्हीवर पहिल्या टी-20 सामनाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार नाही. मात्र फॅनकोड मोबाइल अॅपवर चाहते पहिल्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्कोर अपडेट पाहू शकतात.
NZ vs WI 1st T20I Live Streaming: न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट टीममध्ये आजपासून टी-20 मालिकेला सरुवात होत आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी ऑकलंडच्या (Auckland) इडन पार्क (Eden Park) येथे हा सामना खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेचा अंतिम सामना 30 नोव्हेंबर, 2020 रोजी खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघात 3 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली जाणार आहे. न्यूझीलंडचे नेतृत्व टिम साउदी (Tim Southee) करत आहे, तर वेस्ट इंडिज कीरोन पोलार्डच्या (Kiron Pollard) नेतृत्वात खेळताना दिसेल. मर्यादित ओव्हरच्या मालिकेत न्यूझीलंड संघात केन विल्यमसन आणि ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती देण्यात आली आहे तर वेस्ट इंडीजने आंद्रे रसेल, एव्हिन लुईस आणि लेंडल सिमन्स यांना मालिकेसाठी वगळले आहे. कोरोना व्हायरस काळात क्रिकेट परतल्यानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडचा दौरा केला होता, तर न्यूझीलंड संघाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना ईडन पार्क, ऑकलंड येथे खेळला जाईल. हा सामना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7:00 तर भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता सुरु होईल. दुर्दैवाने, भारतातील चाहत्यांना टीव्हीवर पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामनाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार नाही. मात्र ऑनलाइन स्ट्रीमिंग चाहते पुढे दिलेलं डिटेल्स पाहू शकतात. फॅनकोड मोबाइल अॅपवर चाहते पहिल्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्कोर अपडेट पाहू शकतात. तथापि, ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूजर्सना मात्र फी भरावी लागेल. यूजर्सला मॅच पाससाठी 15 रुपये किंवा टी-20 सीरीज 2020 पाससाठी सीजन पास म्हणून ओळखले जाणारे 29 रुपये द्यावे लागतील.
दरम्यान, न्यूझीलंडने त्यांच्या शेवटच्या सहा टी-20 मालिकांपैकी पाच गमावल्या आहेत आणि आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 आता काही महिने दूर असल्याने कीवीस उत्कृष्ट प्रदर्शन करण्यास उत्सुक असेल. केरॉन पोलार्ड आणि संघाचे लक्ष किवीच्या मातीवरील विजयाकडे लागून आहेत कारण मागील 2017-18 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर मिळवता आला नव्हता.
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2020 11:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

