Vaibhav Suryavanshi Century: वैभव सूर्यवंशींसाठी नितीश सरकारने केली मोठी घोषणा, ऐतिहासिक शतकासाठी मिळणार एवढे पैसे
बिहार सरकारने वैभवला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.
RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकल्याबद्दल 14 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) बक्षीस देण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी घेतला आहे. बिहार सरकारने वैभवला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. सोशल मीडियावरील भावनिक संदेशात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लिहिले की, 'आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (14 वर्षे) ठरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा.' त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे.
वैभवने जयपूरमध्ये इतिहास रचला
बिहारचा रहिवासी असलेल्या सूर्यवंशीने सोमवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर टी-20 शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला. त्याने येथे फक्त 35 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या 38 चेंडूत 101 धावांच्या स्फोटक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने युसूफ पठाणचा 15 वर्षांचा विक्रम मोडत 8 विकेटने विजय मिळवला.
खेळीदरम्यान 7 चौकार आणि 11 षटकार मारले
यापूर्वी, विजय झोल 18 वर्षे 118 दिवसांच्या वयात टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. 2013 मध्ये महाराष्ट्र विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यात विजय झोलने ही कामगिरी केली होती. वैभव सूर्यवंशीचा धोकादायक डाव गुजरात जायंट्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने संपवला. त्याने एका शानदार यॉर्करने वैभवचा त्रिफळा उडवला. पॅव्हेलियनमध्ये परतताना, गुजरात जायंट्सच्या सर्व खेळाडूंनी वैभवचे अभिनंदन केले. वैभवने 38 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 11 षटकार मारले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)