New Zealand Beat India: बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा दणदणीत विजय, भारतावर 8 विकेट्सने केली मात; मालिकेत 1-0 घेतली अशी आघाडी

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने 27.4 षटकात दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले.

NZ Team (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना (IND vs NZ 1st Test 2024) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने 27.4 षटकात दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: Rishbah Pant Breaks MS Dhoni Record: बंगळुरू कसोटीत ऋषभ पंतची शानदार फलंदाजी, धोनीचा विक्रम काढला मोडीत)

बिल यंगची सर्वाधिक नाबाद 45 धावांची खेळी

पाचव्या दिवशी न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बिल यंगने सर्वाधिक नाबाद 45 धावांची खेळी केली. याशिवाय रचिन रवींद्रने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली. रचिनने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या. आता दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे.

पहिल्या डावात भारत 46 धावांवर ऑलआऊट

पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय चूकीचा सिद्ध झाला. प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मॅट हेन्री (5) विल्यम ओरोरके (4) सर्वाधिक विकेट घेतल्या.

न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रची 134 सर्वाधिक खेळी

त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंड तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात दहा विकेट गमावून 402 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 134 सर्वाधिक धावा केल्या. यासह न्यूझीलंडने भारतावार 356 धावांची मोठी आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जेडजाने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.

भारताकडून सरफराजचे शानदार दीड शतक

चौथ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव 99.3 षटकांत 462 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी युवा फलंदाज सरफराज खानने 150 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या खेळीदरम्यान सरफराज खानने 195 चेंडूत 18 चौकार आणि तीन षटकार ठोकले. सरफराज खान व्यतिरिक्त, घातक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने 105 चेंडूत शानदार फलंदाजी करत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. ऋषभ पंतचे मोठे शतक हुकले. या दोघांशिवाय विराट कोहलीने 70 धावांची आणि रोहित शर्माने 52 धावांची खेळी खेळली.