IND vs NZ 2024: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर; अनकॅप्ड जॅकब डफीचा संघात समावेश

याच्या एक दिवस आधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्याचा स्टार युवा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

Ben Sears (Photo Credit: X/@BLACKCAPS)

IND vs NZ 2024: न्यूझीलंडला 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध 3 सामन्यांची (IND vs NZ)कसोटी मालिका खेळायची आहे. याच्या एक दिवस आधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्याचा स्टार युवा वेगवान गोलंदाज बेन सियर्स (Ben Sears) गुडघ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान प्रशिक्षणादरम्यान सीयर्सला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गेल्या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये त्याने गुडघ्याचे स्कॅनिंग केले.

दुखापत बरी होण्यास कालावधी लागणार असल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी अनकॅप्ड गोलंदाज जॅकब डफीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो लवकरच भारतात दाखल होईल. जॅकब डफीने (Jacob Duffy) ब्लॅककॅप्ससाठी सहा एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. सध्या त्याच्या नावावर 299 प्रथम श्रेणी विकेट आहेत. (हेही वाचा: IND W vs NZ W ODI Series 2024 Schedule: भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी आमनेसामने, संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक पहा)

ब्लॅककॅप्सचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की 'सीयर्स लवकर बरा होईल अशी अपेक्षा आहे. तो खेळत नसल्यामुळे आम्ही नक्कीच निराश आहोत. तो लवकरच तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. याआधीही कसोटी संघात सामील असलेल्या जेकबसाठी ही एक रोमांचक संधी आहे.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.



संबंधित बातम्या