IND vs NZ 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: पुणे कसोटीत न्यूझीलंडची सामन्यावर भक्कम पकड, तिसऱ्या दिवशी भारताला करवा लागणार चमत्कार; त्याआधी येथे जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग

यासह न्यूझीलंडने भारतावर 301 धावांची आघाडी घेतली आहे. टॉम ब्लंडेल नाबाद 30 आणि ग्लेन फिलिप्स नाबाद 9 धावांसह खेळत आहे. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

IND vs NZ (Photo Credit: X & Jio Cinema)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात पाच विकेट गमावून 198 धावा केल्या आहे. यासह न्यूझीलंडने भारतावर 301 धावांची आघाडी घेतली आहे. टॉम ब्लंडेल नाबाद 30 आणि ग्लेन फिलिप्स नाबाद 9 धावांसह खेळत आहे. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद 

त्याआधी, भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला काय खास सुरुवात करता आली नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 30-30 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 1 धावावर बाद झाला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या. दुसरीकडे न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर सर्वाधिक सात विकेट घेतल्या.

कुठे पाहणार सामना?

तिसऱ्या दिवसाच्या खेळला भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके

Tags

New Zealand New Zealand National Cricket Team India National Cricket Team Maharashtra Cricket Association Stadium Pune IND vs NZ 2nd Test India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test Rohit Sharma Team India Team India vs New Zealand Test Serie न्यूझीलंड न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ बंगळुरू भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पुणे पुणे कसोटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रोहित शर्मा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका ind वि NZ भारत वि न्यूझीलंड भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 Day 3 Live Streaming


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif