नेटफ्लिक्स इंडियाने रविचंद्रन अश्विन याला दिला 'Man Of The Watch' पुरस्कार, टीम इंडियाच्या फिरकीपटूचे प्रतिसाद पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
सोमवारी अश्विनने नेटफ्लिक्सवरील एका मालिकेबद्दल ट्विट करत आपले मत व्यक्त केले. ज्यानंतर लगेचच नेटफ्लिक्स इंडियाने दिलेले उत्तर वाचून अश्विनला त्याचे हसूच अनावर झाले.
नेटफ्लिक्सवरील एका मालिकेबद्दल प्रतिक्रिया देत टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि नेटफ्लिक्स (Netflix) यांच्यात सोशल मीडियावर विनोदी संभाषण पाहायला मिळाले. सोमवारी अश्विनने नेटफ्लिक्सवरील एका मालिकेबद्दल ट्विट करत आपले मत व्यक्त केले. ज्यानंतर लगेचच नेटफ्लिक्स इंडियाने दिलेले उत्तर वाचून अश्विनला त्याचे हसूच अनावर झाले. अश्विन सध्या टीम इंडियासह संघाच्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी सज्ज होत आहे. बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध होणार दुसरा टेस्ट सामना डे-नाईट सामना असणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा डे-नाईट टेस्ट एसजी बॉलने खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघ आपल्या परीने तयारी करत आहे. हा सामना 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. इंदोरमध्ये मिळालेल्या जोरदार विजयानंतर 33 वर्षीय अश्विन इंदोर (Indore) मध्ये राहत पिंक बॉलने सराव करताना दिसला. (IND vs BAN Day-Night Test: रविचंद्रन अश्विन याने नेट्समध्ये सरावादरम्यान केली सनथ जयसूर्या याच्या गोलंदाजीची नकल, व्हिडिओ व्हायरल)
दरम्यान, अश्विनच्या ट्विटवर नेटफ्लिक्स इंडियाने प्रत्युत्तर देत केले की, “अश्विनच्या उत्तम प्रतापने त्याला आजचा मॅन ऑफ द वॉच अवॉर्ड जिंकला आहे. नेटफ्लिक्सच्या या ट्विटवर प्रतिसाद देण्यामध्ये अश्विनही मागे राहिला नाही आणि म्हटले की तो या अवॉर्डच्या सादरीकरण सोहळ्याची प्रतिक्षा करत आहे. अश्विनने लिहिले की, "सादरीकरण सोहळ्याची वाट पाहत आहे." अश्विन आणि नेटफ्लिक्स इंडियामध्ये रंगलेल्या या संभाषणाचा आनंद सोशल मीडिया यूजर्सनेही लुटला आणि संधी मिळताच अश्विनचे कौतुकही केले.
पाहा अश्विनचा प्रतिसाद
इंदोरमधील टेस्ट सामना फक्त 3 दिवसातच संपुष्टात आला ज्यामुळे दोन्ही संघांना पिंक बॉलने सराव करण्यासाठी जास्त वेळ मिळाला. इंदोरमध्ये सराव करताना अश्विनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो माजी श्रीलंका क्रिकेटपटू सनाथ जयसूर्या यांच्या गोलंदाजीची नक्कल करत गोलंदाजी करताना दिसला. त्यापूर्वी झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनने 5 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात टीम इंडियाने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. यासह संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. आता कोलकातामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया मालिका क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल.