NEP vs SCO ICC CWC League Two 2023-27 Scoecard: नेपाळने स्कॉटलंडचा 5 गडी राखून केला पराभव, आरिफ शेखने झळकावले अर्धशतक तर संदीप लामिछानेने घेतल्या 3 विकेट

ज्यात त्याने 8 चौकार मारले. आरिफ शेखला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दुसरीकडे स्कॉटलंडला 9 सामन्यांतील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

NEP Team (Photo Credit - X)

Nepal National Cricket Team vs Scotland National Cricket Team Scorecard: आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 2023-27 चा 39 वा सामना 29 ऑक्टोबर रोजी नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन येथे खेळला गेला. या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. यासह नेपाळने स्पर्धेतील 10 सामन्यांमध्ये दुसरा विजय नोंदवला. नेपाळकडून फलंदाजी करताना आरिफ शेखने 42 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. ज्यात त्याने 8 चौकार मारले. आरिफ शेखला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दुसरीकडे स्कॉटलंडला 9 सामन्यांतील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या स्कॉटलंड संघ चौथ्या स्थानावर आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचा संघ 41.4 षटकांत सर्वबाद 154 धावांवर आटोपला. स्कॉटलंडची सुरुवात काही खास झाली नव्हती. युवा फलंदाज चार्ली टीअर खाते न उघडताच बाद झाला. तर अँड्र्यू उमिदने 19 चेंडूत 14 धावा केल्या. याशिवाय ब्रँडन मॅकमुलेनने 16 धावा, रिची बेरिंग्टनने 19 धावा, मायकेल जोन्सने 19 धावा, मॅथ्यू क्रॉसने 15 धावा आणि मार्क वॅटने 34 धावा केल्या तर नेपाळकडून संदीप लामिछानेने 10 षटकात 45 धावा देत 3 विकेट घेतल्या. याशिवाय करण के.सी. 2 गडी, सोमपाल कामी 2, गुलसन झा 2 आणि आरिफ शेख 1 गडी बाद केला.

हे देखील वाचा: BAN vs SA 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: बांगलादेशी गोलंदाज पुनरागमन करतील की दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज करणार कहर? दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे थेट प्रक्षेपण कधी अन् कुठे पाहणार घ्या जाणून

155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर नेपाळने 29.5 षटकात 5 गडी गमावून 157 धावा केल्या आणि सामना जिंकला. नेपाळकडून आरिफ शेखने 42 चेंडूत सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. याशिवाय कुशल भुरटेलने 25 धावांचे, गुलसन झाने 25 धावांचे आणि आसिफ शेखने 21 धावांचे योगदान दिले. तर स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय ब्रॅडली करीने 1 बळी, जॅक जार्विसला 1 बळी आणि मार्क वॉटला 1 बळी मिळाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif