‘रोहित शर्मा-विराट कोहलीला सहज आऊट करु शकतो’, पाकिस्तानच्या माजी दिग्गज गोलंदाजांचे वादग्रस्त विधान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने म्हटले की विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन भारतीय दिग्गजांना आऊट करणे सोपे आहे परंतु ऑस्ट्रेलियमी फलंदाज स्टीव्ह स्मिथ त्याच्या दृष्टीने अवघड फलंदाज आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामन्यात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंपैकी एक आमिर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्ती जाहीर केली.

मोहम्मद आमिर (Photo by David Rogers/Getty Images)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) म्हटले की विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन भारतीय दिग्गजांना आऊट करणे सोपे आहे परंतु ऑस्ट्रेलियमी फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) त्याच्या दृष्टीने अवघड फलंदाज आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामन्यात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंपैकी एक आमिर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्ती जाहीर केली. उल्लेखनीय म्हणजे, 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) स्पर्धेत मोहम्मद अमीरने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवनची विकेट घेत टीम इंडियाचा अव्वल क्रम उध्वस्त केला होता ज्यामुळे संघाला पराभव पत्करावा लागला होता. गेल्या दशकाच्या सुरूवातीला मॅच फिक्सिंगसाठी पाच वर्षाची शिक्षा भोगणारा वेगवान गोलंदाज म्हणाला की ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला त्याच्या वेगळ्या तंत्रामुळे गोलंदाजी करणे सर्वात कठीण आहे. (Rohit Sharma याला ‘या’ 5 कारणांमुळे दिली पाहिजे Team India च्या कर्णधारपदाची जबाबदारी)

“मला कोणालाही गोलंदाजी करणे कठीण वाटले नाही. खरं तर, मला रोहित शर्माला गोलंदाजी करणे मला सोपे वाटले. मी त्याला दोन्ही मार्गाने आऊट करू शकतो. डाव्या हाताच्या गोलंदाजाकडून आलेल्या स्विंगरविरुद्ध तसेच लवकर निघून जाणाऱ्या बॉलविरुद्ध तो संघर्ष करतो. मी असे म्हणू शकतो कीमला  विराटला गोलंदाजी किंचित कठीण वाटली आहे कारण तो दबावच्या परिस्थितीत कामगिरी करतो, परंतु अन्यथा या दोघांपैकी कोणालाही मला गोलंदाजी करायला कधीच कठीण वाटले नाही,” अमीरने क्रिकविकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दुसरीकडे, स्मिथच्या बॅटिंगचे कुटून करत आमिर म्हणाला की,“स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करणे मला सर्वात अवघड वाटले. कारण त्याचे तंत्र फारच अवघड आहे [समजणे]. तो अशा अँगलला उभा राहतो की, त्याला कोठे गोलंदाजी करावी हे आपणास समजत नाही,”स्मिथच्या तंत्रामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणे का अवघड होते हे सांगण्यापूर्वी आमिर म्हणाला.

“जर तुम्ही आउटस्विंग गोलंदाजी करत असाल तर तो बॅट वर उचलतो आणि सोडतो. जर आपण पॅडवर गोलंदाजी केली तर तो जोरदार त्याचा फ्लिक शॉट खेळतो. गोलंदाजी करताना मला त्याचे तंत्र खरोखरच कठीण वाटले,” पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now