Rohit Sharma on Khel Ratna: सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या पंक्तीत सामील होणं बहुमान, खेलरत्न पुरस्कारावर रोहित शर्माचे विधान

सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीनंतर खेल रत्न मिळविणारा रोहित चौथा क्रिकेटपटू बनणार आहे. आणि तीन भारतीयांसह या एलिट यादीत सामील झाल्याचा मला अभिमान वाटतो असे रोहित म्हणाला.

रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेल रत्न (Rajiv Gandhi Khel Ratna Award) देऊन सन्मानित केल्याचा मला विशेषाधिकार वाटत असल्याचं भारताचा मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला. टेबल-टेनिस स्टार मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, पॅरालंपियन मरियाप्पन थंगवेलू आणि भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळ पुरस्कार सोहळ्यात खेल रत्न पुरस्कार (Khel Ratna Award) देण्यात येणार आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि देशाला आणखी गौरव मिळवून देण्याचे आश्वासन दिले. रोहित व्हाईट बॉल क्रिकेटमधील भारतीय फलंदाजीचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2019 वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरीनंतर रोहितच्या नावाची शिफारस सर्वोत्तम सन्मानासाठी करण्यात आली होती. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक पाच शतकांसह नऊ सामन्यांमध्ये 648 धावा केल्या. (National Sports Awards 2020: यंदा वर्चुअल समारंभात होणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण, सात्विकसाईराज रंकीरेड्डीसह 3 कोरोना पॉसिटीव्ह विजेते ऑनलाईन सोहळ्याला मुकणार)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीनंतर (Virat Kohli) खेल रत्न मिळविणारा रोहित चौथा क्रिकेटपटू बनणार आहे. आणि तीन भारतीयांसह या एलिट यादीत सामील झाल्याचा मला अभिमान वाटतो असे रोहित म्हणाला. “सर्वोच्च खेळाचा सन्मान मिळाल्याने आम्हाला आनंद झाला. मी खूप खुश आणि मला विशेषाधिकार वाटत आहे. मी माझ्या नावाची शिफारस केल्याबद्दल क्रीडामंत्री आणि बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. मी कठोर परिश्रम करत राहण्याचे व माझ्या देशात गौरव घडवून आणण्याचे आश्वासन देतो,” बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित म्हणाला. “हा एक भाग होण्यासाठी एक अद्भुत गट आहे - या तीनही नावांचा उल्लेख आहे (सचिन, धोनी आणि विराट) ज्यांनी आपल्या देशासाठी गौरवात्मक कामगिरी केली आणि देशामध्ये खूप आनंद आणला. आणि या यादीमध्ये सामील होणे हा एक मोठा सन्मान आहे. मी याबद्दल खूप आनंदी आहे,” तो पुढे म्हणाला.

दुसरीकडे, युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात रोहित अ‍ॅक्शनमध्ये दिसेल. तेथे तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करेल जे यंदा आपले पाचवे विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. गतविजेते चॅम्पियन्ससाठी रोहितचा फॉर्म महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रोहित आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार आयपीएल जेतेपद जिंकले आहेत.