Mzansi Super League 2019 Final: हेनरी डेविड्स याने जडले सर्वात जलद अर्धशतक; एबी डिविलियर्स च्या तशवने स्पार्टन पार्ल ला नमवत रॉक्स संघ बनला चॅम्पियन
बार्लंड पार्कमध्ये झालेल्या तशवने स्पार्टन्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवत पार्ल रॉक्स संघाने यंदाच्या मझांसी सुपर लीग (एमएसएल) चे विजेतेपद मिळाले. यजमान संघाने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पार्ल स्पार्टनच्या हेनरी डेविड्स याने 8 चौकार आणि 4 षटकार मार्ट 44 चेंडूत 77 धावा फाटकावल्या. यादरम्यान, त्याने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
बार्लंड पार्कमध्ये झालेल्या तशवने स्पार्टन्स (Tshwane Spartans) संघावर आठ गडी राखून विजय मिळवत पार्ल रॉक्स (Paarl Rocks) संघाने यंदाच्या मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) चे विजेतेपद मिळाले. यजमान संघाने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पार्ल स्पार्टनच्या हेनरी डेविड्स (Henry Davids) याने 8 चौकार आणि 4 षटकार मार्ट 44 चेंडूत 77 धावा फाटकावल्या. यादरम्यान, त्याने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एमएसएलच्या (MSL) इतिहासातील हे आजवरचे सर्वात जलद अर्धशतक होते. ड्वेन प्रेटोरियस याने 20 चेंडूत 43 धावा केल्या आणि लक्ष्य फक्त 15 ओव्हरमध्ये गाठले. तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) आणि इसुरु उदाना (Isuru Udana) यांनी स्लो खेळपट्टीवर शानदार गोलंदाजीची प्रदर्शन केले. शम्सीने 29 धावांवर 2 गडी बाद केले तर उदानाने 24 धावांवर 2 विकेट घेतल्या. पहिल्या डावात स्पार्टनकडून अब डी डिव्हिलियर्स याने एकतर्फी खेळ केला. त्याने 37 चेंडूत 51 धावा केल्या. (Mzansi Super League 2019: इसुरु उडाना याने दाखवलेल्या 'या' Sportsmanship कृतीचे नेटिझन्सने केले कौतुक, पाहा Video)
पार्लचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा योग्य पर्याय ठरला. डिव्हिलियर्स व्यतिरिक्त डीन एल्गार, हेनरिक क्लासेन आणि पिटे वैन बिलजन हे दोघेही चांगल्या सुरुवातीनंतर निराश फलंदाजी करत पॅव्हिलिअनमध्ये परतले. एल्गारने 22, क्लासेनने 21 आणि बिलजनने 19 धावांचे योगदान दिले. 13 व्या ओव्हरपर्यंत स्पार्टनचा स्कोर 91 धावांवर 3 बाद असा होता. सुरुवातीला मोठे धक्के लागल्यावर संघाने त्यांचा डाव संपुष्टात येण्यापर्यंत 6 बाद 147 धावा केल्या होत्या.
दुसर्या डावात, डेव्हिडस चमकण्याची वेळ आली. त्याने कॅमेरून डेलपोर्ट याच्यासह पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली आणि डेलपोर्ट बाद झाल्यानंतर ड्वेन प्रिटोरियससह 52 धावांची भागीदारी करतरॉक्सचा विजय निश्चित केला. त्यानंतर डू प्लेसिस फलंदाजीला आला आणि रॉक्स संघ चॅम्पियन बनला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)