Mumbai Indians Vs Delhi Capitals: मुंबई इंडियन्स संघाचे 'तेलही गेले आणि तुपही गेले', रोहित शर्मा याला 12 लाख रुपयांचा दंड
आयपीएलने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) नियमांचे उल्लंघन केले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची 'तेलही गेले आणि तुपही गेले' अशी अवस्था झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान दिल्ली कॅपीटल्स (Delhi Capitals) संघासोबत मुंबई इंडियन्सचा सामना सुरु होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाला. या पराभवामुळे या संघाला केवळ सामनाच गमवावा लागला नाही. तर सोबत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला 12 लाख रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. आयपीएलने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) नियमांचे उल्लंघन केले. सहाजिकच मुंबई इंडियन्सला सामना तर गमवावा लागलाच आहे. वरुन 12 लाख रुपयांचा भुर्दंडही बसला आहे.
गेल्या वरषी आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपटल्सला पराभूत केले होते. मंगळवारी दिल्लीने या पराभवाचा वचपा काढला. महत्त्वाचे म्हणजे 2010 नंतर चेन्नईमध्ये दिल्लीचा संघ पहिल्यांदा विजयी झाला. चार सामन्यांमध्ये तीसऱ्या विजयासबत दिल्लीचा संघ आता पॉइंट टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सच्या 4 गुणांनी चौथ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, IPL 2021 Purple Cap List Updated: दिल्लीच्या आवेश खानची चांगली कामगिरी, पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर; बेंगलोरचा हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम)
दिल्ली कॅपीटलच्या विजयात फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये 24 धावांच्या बदल्यात 4 गडी बाद केले आणि मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी जखडून ठेवली. त्यानंतर शिखर धवन याने 45 धावांची खेळी खेळली. मुंबई संघाविरुद्ध सलग पाच वेळा पराभाचा सामना करवा लागल्यानंतर दिल्लीने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा विजय आत्मविश्वासाच्या दृष्टीने बराच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे की, संघाला सध्या खूप सुधारणांची आवश्यकता आहे. रोहितने सामन्यानंतर म्हटले की, आम्हाला अधिक चांगली फलंदाजी करायला हवी. आम्हाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही असे दिसते आहे. आम्हाला माहिती होते की सामन्यावेळी दव (Dew) महत्त्वाची भूमिका निभावेल. दवामुळे चेंडू पकडण्यात कोणतीच अडचण येत नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात दव हा विशेष प्रभावी घटक नव्हता. सद्या मला साधारण जखम आहे. मी ठिक आहे. विशेष काही त्रास नाही.