Mumbai Indians 'Saiyyan' Singing Video: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह इतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य, पहा मजेशीर व्हिडीओ (Watch)

आता संघाच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह इतर काही खेळाडू ट्रेंडींग रील बनवताना दिसले आहेत.

Mumbai Indians 'Saiyyan' Singing Video: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह इतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य, पहा मजेशीर व्हिडीओ (Watch)
Mumbai Indians 'Saiyyan' Singing Video

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्याने मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला. प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर संघामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता संघाच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह इतर काही खेळाडू ट्रेंडींग रील बनवताना दिसले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव, नेहल वढेरा यांच्यासह मुंबईचे काही खेळाडू कैलाश खैरचे ‘सैयां’ हे गाणे गाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. (हेही वाचा: Rohit Sharma च्या वेंधळेपणाचा अजून एक व्हिडिओ वायरल; पाण्याच्या बॉटलची कॅप न काढताच लावली तोंडाला पहा फॅन्सच्या प्रतिक्रिया)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).