PBKS vs MI Qualifier 2 Live Scorecard: मुंबईने अहमदाबादमध्ये पाडला चौकार आणि षटकारांचा पाऊस, पंजाबला दिले 204 धावांचे लक्ष्य; कोण जिंकणार सामना?

आजच्या सामन्यात पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. तर जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीसीसोबत खेळेल. अशा परिस्थितीत, चाहत्यांना दोन्ही संघांमधील कठीण सामना पाहता येईल. दरम्याण, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियंसने पंजाब किंग्जसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

PBKS vs MI Qualifier 2 Live Scorecard: मुंबईने अहमदाबादमध्ये पाडला चौकार आणि षटकारांचा पाऊस, पंजाबला दिले 204 धावांचे लक्ष्य; कोण जिंकणार सामना?

Punjab Kings vs Mumbai Indians, TATA Indian Premier League 2025 Qualifier 2:  इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा क्वालिफायर सामना आज म्हणजेच 1 जून रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. तर जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीसीसोबत खेळेल. अशा परिस्थितीत, चाहत्यांना दोन्ही संघांमधील कठीण सामना पाहता येईल. दरम्याण, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियंसने पंजाब किंग्जसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 19 धावांवर बसला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि तिलक वर्मा यांनी मिळून डाव सांभाळला आणि संघाचा स्कोअर 70 धावांवर नेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 203 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने 44 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त तिलक वर्माने 44 धावा केल्या.

दुसरीकडे, स्टार ऑलराउंडर मार्कस स्टोइनिसने पंजाब किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पंजाब किंग्जकडून अझमतुल्लाह उमरझाईने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. अझमतुल्ला उमरझाई व्यतिरिक्त, मार्कस स्टोइनिस, विजयकुमार वैश्य, युजवेंद्र चहल, काइल जेमिसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 204 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2025 11:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).