एमएसके प्रसाद यांचा खळबळजनक खुलासा, या कारणामुळे नाही झाली महान फील्डर जॉन्टी रोड्स यांची निवड
सहाय्यक कर्मचार्यांची निवड करण्याबाबतची माहिती देताना प्रसादने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड्सयांची प्रशिक्षक म्हणून निवडल्या न केल्याबद्दल एक विचित्र विधान केले आहे.
गुरुवारी एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने पुन्हा एकदा आर श्रीधर (R Sridhar) यांची टीम इंडियाचे नवीन सहाय्यक कर्मचारी म्हणून निवड केली. सहाय्यक कर्मचार्यांची निवड करण्याबाबतची माहिती देताना प्रसादने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांची प्रशिक्षक म्हणून निवडल्या न केल्याबद्दल एक विचित्र विधान केले आहे. आणि हे क्रिकेट चाहत्यांना सहज स्वीकारण्यासारखे नाही. साद म्हणाले की, जॉन्टी रोड्स हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून निवड समितीची पहिली पसंती नव्हते. ते म्हणाले, आर श्रीधर आज जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. त्यांनी भारतीय संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघात रूपांतर केले आहेत. सुदैवाने विश्वचषक स्पर्धेदरम्यान श्रीधरला अपेक्षित निकाल मिळाला नाही कारण संघाची जोड अशी होती की अंतिम 11 मध्ये दोन-तीन विकेटकीपरांचा समावेश केला गेला होता. आणि अशा वेळी श्रीधर यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या बाबतीत शंका नव्हती." (टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदांसाठी केली 'या' उमेदवारांची निवड; फलंदाजीसाठी विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर)
प्रसाद पुढे म्हणाले की, "आम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी जॉन्टी योग्य वाटले नाही, कारण त्यांची भूमिका भारत-अ पातळी आणि एनसीएसाठी खूपच जास्त आहे." श्रीधरबरोबरच टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भारत अरुण यांचे नाव पुन्हा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या नावांच्या यादीमध्ये भारत-अ आणि 19 वर्षांखालील संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आणि टी दिलीप तिसर्या क्रमांकावर आहे. रोड्स यांनी क्षेत्ररक्षण पदासाठी अर्ज केले होते पण त्यांना या यादीमध्ये स्थान मिळालं नाही. रोड्स यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक संघांसह क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आहे आणि कोचिंगमधील त्याचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दक्षिण आफ्रिका संघाबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहेत.