Video: लॉकडाउनमध्ये एमएस धोनीची मुलगी जिवा अशा प्रकारे करत आहे स्वच्छतेची काळजी, पाहून तुम्हीही म्हणाला Aww
सोमवारी माजी टीम इंडिया कर्णधार महेंद्र सिंह धोनीची मुलगी जिवा धोनी आपल्या घरी गार्डनची साफसफाई करताना दिसली. नुकत्याच शेअर करण्यात आलेला व्हिडिओचीएक छोटीशी क्लिपजिवा धोनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. "ही पाने विघटित होण्याची वेळ आली आहे!" असे कॅप्शन दिले.
जगभर पसरलेल्या कोविड-19 (COVID-19) आजारामुळे सर्वांचे जीवन ठप्प ठप्प झाले आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर लोकं घरातील इतर कामांमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहेत जे सुरुवातीला त्यांच्या नित्याचा भाग नव्हते. सोमवारी माजी टीम इंडिया कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) मुलगी जिवा धोनी (Ziva Dhoni) आपल्या घरी गार्डनची साफसफाई करताना दिसली. जिवा लॉनमधून काठ्या आणि मृत पाने उचलताना आणि टोपलीमध्ये ठेवताना दिसली. काही दिवसांपूर्वी जिवाचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यामध्ये तो धोनीचा मेकअप करताना दिसत होती. धोनीची मुलगी जिवा धोनीही लोकप्रियतेच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. जेव्हा जेव्हा जिवाबद्दल एखादा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातो तेव्हा तो त्याला खूप पसंत केले जाते. (एमएस धोनी याच्या निवृत्तीबद्दल मोठी बातमी, 'कॅप्टन कूल' नेट घेतलाय निवृत्तीचा निर्णय पक्का: सूत्र)
नुकत्याच शेअर करण्यात आलेला व्हिडिओचीएक छोटीशी क्लिपजिवा धोनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. "ही पाने विघटित होण्याची वेळ आली आहे!" असे कॅप्शन दिले. पाहा
View this post on Instagram
It’s time to decompost these leaves !
A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on
आयपीएल 2020 मध्ये धोनीने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार अशी अपेक्षा होती. तथापि, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन अंतर्गत असल्याने आयपीएलवरील अनिश्चितता कायम आहे. आयपीएलचे आयोजक टी-20 लीगचे आयोजन करण्यापूर्वी सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत प्रतीक्षा करत आहे. इंग्लंडमधील 2019 च्या विश्वचषकात भारताच्या सेमीफायनल फेरीतून बाहेर पडल्यानंतर विश्वचषक विजेत्या कर्णधाराने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नाही. शिवाय, त्याच्या आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागावरही संभ्रम बनले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)