CSK: दीपक चाहरची पावर प्ले मध्ये चांगली कामगिरी; महेंद्रसिंह धोनीला दिले श्रेय, सांगितले कारण
श्रीलंका दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेत चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएलमधील यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) पॉवरप्ले गोलंदाज होण्याचे श्रेय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) दिले आहे. श्रीलंका दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेत चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, चहरने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, माही भाईने मला पावर प्लेमधील गोलंदाज बनवले आहे. त्यांनी नेहमी मला सांगितले की, तू पावर प्ले गोलंदाज आहेस. ते बहुधा सामन्यामधील पहिली ओव्हर मलाच देतात. त्यांनी मला अनेकदा फटकारले आहे. परंतु, मला माहिती आहे, की त्यांच्या याच गोष्टीचा मला अधिक फायदा झाला आहे.
दीपक चाहर म्हणाला की, , "माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे माझे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. त्याच्या नेतृत्वाखाली मला बरेच काही शिकायला मिळाले. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा खेळ दुसर्या स्तरावर नेला. त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आणि शिकवले. मी जबाबदारी कशी घ्यावी? माझ्या संघात कोणीही नाही जो पॉवरप्लेमध्ये तीन ओव्हर टाकतो. माही भाईमुळे मी हे करतो. संघासाठी पहिली ओव्हर टाकणे सोपे काम नाही. मी कालंतराने विशषत: टी-20 सामन्यांमध्ये धावांवर कसे नियंत्रण मिळवायचे? यात सुधारणा केली आहे. हे देखील वाचा- ‘रोहित शर्मा-विराट कोहलीला सहज आऊट करु शकतो’, पाकिस्तानच्या माजी दिग्गज गोलंदाजांचे वादग्रस्त विधान
चहरने आयपीएल 2021 मध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी केली होती. दरम्यान, अनेक विकेट्सही पटकावले आहेत. त्याने दोनदा चार विकेट्स घेतले आहेत. कोरोनामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम अर्ध्यातच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आयपीएलच्या या हंगामात चेन्नईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. या हंगामात चेन्नईच्या संघाने सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.