टी-20 विश्वचषक 2020 नंतर महेंद्र सिंह धोनी ने निवृत्ती घ्यावी, 'कॅप्टन कूल' च्या सेवानिवृत्तीवर बालपण प्रशिक्षकाचे मत
आणि त्याने पुढील टी-20 विश्वचषक खेळावे आणि त्यानंतर भविष्यात काय करायचे ते ठरवावे.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाचे (Indian Team) विश्वकपमधील आव्हान संपुष्टात आले. संपूर्ण विश्वचषक भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या मंद खेळीवर टीका केली जात होती. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड विरुद्ध महत्वाच्या सामन्यात धोनी अत्यंत संथ खेळी करताना दिसला. परिणामी संघाला हे दोन्ही सामने गमवावे लागले. त्यानंतर धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी तज्ज्ञ आणि चाहत्यांकडून मागणी केली जात आहे. यावर धोनीने अजून कोणतेही भाष्य केले नाही. पण त्याच्याशी निगडित काही बोलले जात आहे. आणि आता सुत्रांप्रमाणे धोनी पुढील वाशी ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकनंतर निवृत्ती जाहीर करू शकतो. (एम एस धोनी च्या निवृत्तीच्या वादावरआई-वडिलांनी सोडले मौन, दिली ही प्रतिक्रिया)
धोनीचे बालपणचे प्रशिक्षक केशव बनर्जी (Keshav Banerjee) इंडियनएक्सप्रेसला बोलताना म्हणाले की, "मला वाटते की माहीने टी-20 फॉर्ममध्ये खेळणे सुरु ठेवले पाहिजे. वनडे क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणे आणि नंतर फलंदाजीची करणे हे मुश्किल आहे. शरीरासाठी ते फारच कठीण आहे. धोनीचा फिटनेसचा स्तर दर्शवितो की तो टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहे. मला वाटते की तो पुढील टी-20 विश्वचषक खेळेल आणि त्यानंतर भविष्यात काय करायचे ते ठरवेल."
दरम्यान, निवड समिती प्रमुख एम एस के प्रसाद (MSK Prasad) लवकरच धोनीशी त्याच्या निवृत्ती संदर्भात चर्चा करणार आहेत. धोनीनं स्वतःहून निवृत्तीचा निर्णय न घेतल्यास, त्याला पुढे संघातून कधी खेळायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे असा प्रसंग उभा राहण्यापूर्वीच प्रसाद हे धोनीशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे, 2020 च्या टी-20 विश्वचषकसाठीच्या संघ निवडीत धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळत आहेत.