एमएस धोनी याने घेतली निवृत्ती? सोशल मीडियावर #DhoniRetires ट्रेंड झाल्याने चाहत्यांना धक्का, पाहा Tweets

हे पाहून धोनीच्या चाहत्यांना मात्र धक्काच बसला. धोनीच्या निवृत्तीच्या अफवांवर चर्चा करण्यासाठी रात्रभर धोनीच्या अनुयायांची फौज एकत्र केली. सध्या #DhoniRetires च्या ट्रेंडनंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिले.

एमएस धोनी

आयसीसी क्रिकेट विश्वचषकनंतर टीम इंडियाचा (Indian Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. विश्वचषकमध्ये धोनी काही खास कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे त्याने आता निवृत्ती घ्यावी असे मत चाहते आणि विशेषज्ञानी व्यक्त केले. पण, धोनीने यासर्वांकडे लक्ष न देता क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेत भारतीय सैन्या (Indian Army) सोबत ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. या काळात, धोनी आज, उद्या निवृत्ती जाहीर करेल याबाबत अनेकदा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या. कर्णधार विराट कोहली याने धोनी सोबतचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांनी त्याला एक वेगळीच दिशा दिली. आणि आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर #DhoniRetires असा ट्रेंड सुरु झाला आहे. हे पाहून धोनीच्या चाहत्यांना मात्र धक्काच बसला. (IND vs SA Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये दिसला एम एस धोनी, शाहबाझ नदीम याला दिला गुरु मंत्र)

धोनीच्या निवृत्तीच्या अफवांवर चर्चा करण्यासाठी रात्रभर धोनीच्या अनुयायांची फौज एकत्र केली. धोनीने आजवर त्याच्या निवृत्तीबद्दल उघडपणे काही वक्तव्य केले नाही. यावर्षी किंवा नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल याचा निर्णय स्वतः 'कॅप्टन कूल'वरच सोडला तर बारा. पण, हे मात्र नक्की की जेव्हा धोनी निवृत्ती जाहीर करेल तो क्षण त्याच्या चाहत्यांसाठी खूप भावनिक असेल. सध्या #DhoniRetires च्या ट्रेंडनंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिले. पहा इथे:

#DhoniRetires ट्रेंडिंग पाहिल्यानंतर, हृदयाचे धोकेच बसले...

त्याच्या निवृत्तीबाबत अफवा कोण पसरवत आहे... 

#DhoniRetires यापेक्षा काहीही दुःखद असू शकत नाही... 

ट्विटरवर #DhoniRetires पाहिल्यानंतर

मी टू पीप ट्रेंडिंग

धोनी सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, त्याला दक्षिण आफ्रिका आणि आता बांग्लादेशविरुद्ध मालिकेतून विश्रांती देण्यात आली. विश्वचषकपासून धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक कटाक्ष सुरू आहेत. आफ्रिकाविरुद्ध रांची कसोटी संपल्यानंतर धोनी टीम इंडियाबरोबर ड्रेसिंग रूममध्ये दिसला होता. प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही धोनीसह एक फोटो ट्विट केला होता.