भारतीय क्रिकेटमधील 'या' 7 खेळाडूंनी सरकारी अधिकारी म्हणून बजावली भूमिका, दोन वर्ल्ड कप विजेता कर्णधारांचाही आहे समावेश, घ्या जाणून
चला तर मग अशा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्या जे सरकारी अधिकारीही आहेतः
जगभरातील क्रीडा व्यक्तिमत्त्व सर्वात जास्त नामांकित व्यक्तींपैकी एक आहे. भारतात या यादीत क्रिकेटपटू अव्वल क्रमांकावर असतात. जगातील एक यशस्वी क्रिकेटर चित्रपट स्टारपेक्षा कमी नाही आणि त्याचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत. भारतात क्रिकेटपटू (Indian Cricketers) नेहमीच चर्चेत बनलेले असतात. एन्डोर्समेंट सौद्यांपासून ते प्रसिद्धीपर्यंत, क्रिकेट क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केल्यावर क्रिकेटपटूंना सर्व काही मिळतं. विशेष म्हणजे सरकारने अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंना प्रतिष्ठित पदांवर नियुक्त करून पुरस्कृत केले आहे. असे बरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी पोलिस किंवा इतर सरकारी एजन्सींमध्ये अधिकृत पदं सांभाळली किंवा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (COVID-19 Pandemic: मैदानावर घाम गाळणारे 'हे' खेळाडू कोरोना व्हायरसच्या संकट काळात पोलीस म्हणून लढत आहे लढाई)
भारतीय क्रिकेटमधील दोन विश्वचषक विजेता करणारांचाही समावेश आहे. शिवाय, 2007 मध्ये आयोजित पहिले टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून देणारा गोलंदाजही डीएसपी म्हणून कार्यरत आहे. चला तर मग अशा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्या जे सरकारी अधिकारीही आहेतः
1. जोगिंदर शर्मा
टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून भारताने जिंकलेल्या विश्वचषकात शर्मा भारताचा नायक ठरला होता. अंतिम सामन्यात जोगिंदरने शेवटची ओव्हर टाकली आणि मिसबाह उल हकला बाद करून भारताला सामना आणि ट्रॉफी जिंकण्यास मदत केली. 2007 पासून जोगिंदर हे हरियाणामध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
2. कपिल देव
भारताचा पहिला विश्वचषक जिंकावणारे माजी कर्णधार कपिल देव यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद सन्मान प्रदान करण्यात आला आहे. भारतीय सैन्यात अशा पदवीने गौरविण्यात आलेला तो पहिला क्रिकेटपटू होता.
3. एमएस धोनी
धोनी केवळ विश्वचषक जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला नाही तर भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद पद मिळणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला.
4. हरभजन सिंह
भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज हरभजन सिंह याची क्रिकेटमध्ये देशासाठी केलेल्या सेवांमुळे पंजाब पोलिसांनी उपअधीक्षक म्हणून नेमणूक केली.
5. सचिन तेंडुलकर
2015 मध्ये 83 व्या वायुसेना दिनाच्या वेळी सचिन तेंडुलकरला गट कर्णधार म्हणून सन्मानित करण्यात आले. अशा क्रमांकाचा सन्मान मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे.
6. हरमनप्रीत कौर
भारतीय महिला टी-20 कर्णधार पंजाब पोलिसात हवालदार आहे. तिला डीएसपी म्हणून बढती देण्यात आली पण चार महिन्यांनंतर पदवी संबंधित वादामुळे तिचे डिमोशन करण्यात आले.
7. युजवेंद्र चहल
सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असणारा चहल इंडियन प्रीमियर लीग संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (आरसीबी) सामना जिंकावणारा गोलंदाज आहे. फिरकीपटू भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. 2018 मध्ये चहलला आयकर विभागात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त केले होते.
काही महिन्यांपूर्वी धोनीने स्वतः क्रिकेटमधून ब्रेक घेत भारतीय सैन्यासोबत प्रशिक्षणही घेतले होते. क्रिकेटमध्ये देशासाठी केलेल्या कामामुळे खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये बढती दिली जाते.