MS Dhoni Images & HD Wallpapers For Free Download: एमएस धोनी याच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर करा शुभेच्छा, ग्रीटिंग्ज, टीम इंडिया आणि भारतीय सेनेच्या युनिफॉर्म मधील फोटो

त्याचे कट्टर चाहते बेडरूममध्ये त्यांची आवडत्या आयडलचे पोस्टर्स, डेस्कटॉप/लॅपटॉपवर वॉलपेपर, मोबाइल स्क्रीन सेव्हर आणि असेच काही फोटो लावून आपलं प्रेम व्यक्त करतात. धोनीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि मेसेजसह HD फोटो येथे पाहा.

एमएस धोनी (Photo Credit: Facebook)

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दोन वर्ल्ड कप विजेता महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मंगळवारी, 7 जुलै रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांमध्ये या खास दिवसाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 7 जुलै, 1981 रोजी जन्मलेला एमएस धोनी (MS Dhoni), क्रिकेट विश्वातील एक प्रचलित नाव आहे आणि सर्वकालिक महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 2004 मध्ये भारताकडून (India) पदार्पण करणाऱ्या धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिले 2007 टी-20, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. दोन विश्वचषक स्पर्धा जिंकणारा धोनी सध्या एकमेव कर्णधार आहे. इतकंच नाही तर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) देखील धोनीला टक्का देणारा एकही कर्णधार नाही. आयपीएलमध्ये धोनी आजवर कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय नोंदवले आहे. त्याचे कट्टर चाहते बेडरूममध्ये त्यांची आवडत्या आयडलचे पोस्टर्स, डेस्कटॉप/लॅपटॉपवर वॉलपेपर, मोबाइल स्क्रीन सेव्हर आणि असेच काही फोटो लावून आपलं प्रेम व्यक्त करतात. (जेव्हा पापा एमएस धोनी याने बेशुद्ध पक्ष्याला दिले जीवदान, लेक जीवाने सांगितली कहाणी)

तर, एमएस धोनीच्या 39 व्या वाढदिवसाच्या आधी आम्ही आपल्यासाठी त्याच्या फोटोंचा संग्रह, एचडी वॉलपेपर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, भारतीय संघातील आणि आयपीएल टीम सीएसके जर्सीतील धोनीचे फोटो आणि बरेच काही फ्री डाउनलोडसाठी घेऊन आलो आहोत. आपल्यापैकी बरेचजण एक खेळाडूला आयडल मानून मोठे झालो आहोत. खेळाचा एक प्रकारचा प्रभाव आहे. आणि धोनी खेळाचा सर्वोत्तम एम्बेसडर आहे. धोनी लाखो आणि कोट्यावधी चाहत्यांसाठी रोल मॉडेल आहे, मग ती लहान मुले असो किंवा युवा. धोनीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि मेसेजसह HD फोटो येथे पाहा:

एमएस धोनी 2019 टीम इंडिया जर्सीमध्ये

एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

टीम इंडियाच्या ऑरेंज जर्सीमध्ये एमएस धोनी

एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज जर्सी मधील एमएस धोनी एचडी फोटो

एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

भारतीय सैन्य गणवेशात एमएस धोनी एचडी वॉलपेपर

MS Dhoni (Photo Credits: PTI)

वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी सोबत एमएस धोनी वॉलपेपर

एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

पाकिस्तान विरुद्ध टी-20 वर्ल्ड कप विजय

भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty)

महेंद्र सिंह धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे की धोनीचे सर्व चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूचे सर्व सुंदर फोटो आणि वॉलपेपर पाहून आनंदित होतील. त्यामुळे, आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि धोनीचे फोटो व वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शेअर करा आणि त्यांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, स्टोर म्हणूनही तुम्ही सेट करू शकता.