IND vs BAN मॅचमध्ये एम एस धोनीवर कॉमेंट्री दरम्यान संजय मांजरेकर ने केली टीका, चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्याच अंदाजात घेतली शाळा, पहा Tweets

यंदाच्या विश्वकपमध्ये मांजरेकर आपल्या पक्षपाती कॉमेंट्रीसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

(Photo Credits: Twitter)

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) अनेकदा आपल्या वक्तव्यांने क्रिकेट चाहत्यांच्या टीकाचा बळी पडला आहे. आणि आता भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) वर टीका केल्याने मांजरेकर धोनीच्या चात्यांचे नजरेत आला आहे. मांजरेकर सध्या 2019 आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या एलिट कमेंटरी टीमचा एक भाग आहे. आणि असे दिसते की भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) मॅच दरम्यान मांजरेकरांचा धोनीविरुद्धचा पक्षपातीपणा चाहत्यांना आवडत नाही आणि त्यांनी आपल्याच भाषेत त्यांची शाळा घेतली. (ICC World Cup 2019: शतकासोबतच रोहित शर्मा ने केले हे 5 विक्रम! सौरव गांगुली, कुमार संगकारा सारख्या दिग्गजांना सोडले मागे)

एका ट्विटर युजर ने लिहिले, "जेव्हा संजय मांजरेकर इंग्रजी भाषेत समालोचाला येतो तेव्हा मी हिंदीकडे वळतो. जेव्हाही ते हिंदी भाषेत कॉमेंट्री करायला येतात तेव्हा मी इंग्रजीकडे वळतो." तर दुसर्याने विचारले, मांजरेकरच्या बदली कोणी दुसरा मिळेल का?

यंदाच्या विश्वकपमध्ये मांजरेकर आपल्या पक्षपाती कॉमेंट्रीसाठी चर्चेचा विषय बनला आहे. याआधी, एका ऑस्ट्रेलियन (Australia) चाहत्याने आयसीसी ला पत्र लिहून मांजरेकरांनी तक्रार केली होती. शिवाय, याआधी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि इंग्लंड (England) विरुद्ध सामन्यात धोनीच्या संथ खेळीची मांजरेकर यांनी टीका केली होती.