IPL Auction 2025 Live

MS Dhoni Birthday: '2 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवून देणाऱ्याला काय गिफ्ट देणार?' एमएस धोनीसाठी केदार जाधवचं भावनिक पत्र

भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनेही धोनीला पत्राद्वारे खास शुभेच्छा दिल्या. पत्रात केदारने भारताला दोन वर्ल्ड, चॅम्पिअनस ट्रॉफी आणि टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवून देणाऱ्याला काय गिफ्ट द्यायचं हे सुचलं नाही म्हणून त्याने पत्र लिहिलं असल्याचं म्हटलं.

एमएस धोनी, केदार जाधव (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार आणि 'कॅप्टन कूल' एमएस धोनीचा (MS Dhoni) आज 39 वा वाढदिवस आहे. आजच्या खास दिवसानिमित्त धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनेही (Kedar Jadhav) धोनीला पत्राद्वारे खास शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटरवर पत्र शेअर करत क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं केदारने म्हटलं आहे. माही भाई, गेली 15 वर्षे तुम्हाला खेळताना पाहिलंय तरी अजूनही आमचं मन भरलं नाही. माझ्यासह संपूर्ण देशाला तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना पाहायचंय. तुम्ही क्रीझवर उभे राहाल आणि ‘माही मार रहा है’ म्हणत सगळा देश जल्लोष करेल अशी भावनिक सादही केदारने घातली. दरम्यान, अगदी कमी वेळात केदारचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्याला 1,000  रिट्विट आणि 4,000 लाईक्स मिळाले. (हार्दिक पांड्या, सुरेश रैना, BCCI सह दिग्गजांनी अशा दिल्या एमएस धोनीला 39 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माही भाई! माझ्या आणि अनेक फॅन्सच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न," म्हणत केदारने ट्विटरवर पत्र शेअर केलं. धोनीच्या नेतृत्वात केदार आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. पत्रात केदारने भारताला दोन वर्ल्ड, चॅम्पिअनस ट्रॉफी आणि टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवून देणाऱ्याला काय गिफ्ट द्यायचं हे सुचलं नाही म्हणून त्याने पत्र लिहिलं असल्याचं म्हटलं. शिवाय, त्याने पत्राद्वारे आपल्या क्रिकेट प्रवासाला उजाळा दिला आणि धोनीसोबत त्याच नातं तयार झाले याबाबतही सांगितले.

वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यापासून धोनी जुलै 2019 पासून कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. यावर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) तो पुनरागमन करणे निश्चित होते, मात्र कोरोना व्हायरसमुळे भारतातील प्रसिद्ध टी-20 लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने धोनीचे पुनरागमनही लांबणीवर गेले. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीचा वाढदिवसानिमत्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार्दिक पांड्या, विराट कोहली, सुरेश रैना आणि अन्य खेळाडूंनी सोशल मीडियाद्वारे धोनीला शुभेच्छा दिल्या.