Narendra Modi Stadium: जगातील सर्वात मोठं स्टेडियम पंतप्रधान 'मोदींच्या नावावर', खेळांच्या सुविधांनी आहे सुसज्ज

भारतातील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन 24 फेब्रुवारी 2020 रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या स्टेडियमचे नाव अद्याप सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम होते, परंतु राष्ट्रपती कोविंद यांनी रिमोटचे बटण दाबून जेव्हा या स्टेडियमचे डिजिटली उद्घाटन करताच सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण या स्टेडियमचे नाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद (Photo Credit: Twitter/BCCI)

Motera Stadium Inauguration: गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad) शहरात बनलेल्या भारतातील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे (Worlds Largest Cricket Stadium) उद्घाटन 24 फेब्रुवारी 2020 रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या स्टेडियमचे नाव अद्याप सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम होते, परंतु राष्ट्रपती कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी रिमोटचे बटण दाबून जेव्हा या स्टेडियमचे डिजिटली उद्घाटन करताच सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण या स्टेडियमचे नाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावावर आहे. आतापर्यंत सरदार पटेल स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टेडियमचे उद्घाटन होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच नाव बदलण्यात आलं असून आता नरेंद्र मोदी असं नामकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे, नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अहमदाबादच्या साबरमती येथे निर्माण केलेले हे स्टेडियम आधुनिक खेळांच्या सुविधांनी सुसज्ज आहे. या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, ऑलिम्पिक-स्तरीय जलतरण तलाव, इनडोअर अकादमी, अ‍ॅथलिट्ससाठी चार ड्रेसिंग रूम आणि फूड कोर्ट आहेत. (IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, असा आहे दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन)

भारत आणि इंग्लंड संघात पहिल्यांदा होणारा पहिला डे-नाईट टेस्ट याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना आजपासून या मैदानात खेळवला जाणार असून हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळवला जाणार आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने याच मैदानात आयोजित केले जाणार आहेत. सामन्याच्या काही तासांपूर्वी या स्टेडियमचे उदघाटन करण्यात आले असूनकेंद्रीय गृहमंत्री आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शाह या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते. हे स्टेडियम 63 एकर क्षेत्रात पसरलेले असून एकाच ठिकाणी 10 लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. या स्टेडियमची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वतः घातली होती. तथापि, आता ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि तेही या स्टेडियमवर आले होते.

पंतप्रधान मोदी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी स्टेडियमचे उद्घाटन होणार होते मात्र, स्टेडियमचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now