Most Runs in IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा; यादीत 4 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत 13 हंगाम झाले आहेत. तर, येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.
Indian Premier League 2021: भारतात खेळली जाणारी इंडियन प्रिमीअर लीग ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत 13 हंगाम झाले आहेत. तर, येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. दरम्यान, गोलंदाजांनी त्यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. पण, पॉवर हिटर्स फलंदाजांनी चाहत्यांना वेगळाच आनंद दिला आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वव 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत चक्क 4 भारतीय फलंदाजाचा समावेश आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पहिला सामना 9 एप्रिलला खेळला जाणार आहे. पहिली लढत गत विजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. नेहमीप्रमाणे या आयपीएलमध्ये देखील या वर्षी नवे विक्रम होण्याची शक्यता आहे. यात काही असे खेळाडू आहेत त्यांना स्पर्धेत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर इतिहास घडवण्याची संधी आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे अधिक लक्ष असेल. हे देखील वाचा- IPL 2021 वर कोरोनाचे सावट, वानखेडे स्टेडियमवरील 8 कर्मचारी आढळले COVID-19 पॉझिटिव्ह
5) शिखर धवन-
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन पाचव्या क्रमांकावर आहे. शिखरने आयपीएलमध्ये चार संघाचे प्रितिनिधित्व केले आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 175 डावात 34. 41 च्या सरासरीने 5 हजार 197 धावा केल्या आहेत.
4) रोहित शर्मा-
मुंबई इंडियन्सच्या संघाला 5 वेळा आयपीएलचे जेतपद जिंकून देणारा रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने या स्पर्धेत 195 डावात 5 हजार 230 धावा ठोकल्या आहेत. यात 39 अर्धशतकांचाही समावेश आहे.
3) डेव्हिड वार्नर-
आस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वार्नरने नेहमीच आपल्या खेळीने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. डेव्हिड वार्नरने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 142 डावात 42.7 च्या सरासरीने 5 हजार 254 धावा केल्या आहेत. एवढेच नव्हेतर, तीन वेळा ऑरेंज कॅपचा खिताब आपल्या नावावर नोंदवला आहे.
2) सुरेश रैना-
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाच्या विक्रम आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाच्या नावावर होता. मात्र, वयैक्तिक कारणांमुळे सुरेश रैना मागच्या हंगामातून बाहेर झाला होता. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कर्णधार विराट कोहलीली मागच्या हंगामात धावांचा पाऊस पाडत सुरेश रैनाला मागे टाकले आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 189 डावांत 5 हजार 368 धावा ठोकल्या आहेत. यात एक शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
1) विराट कोहली-
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा कर्णधार विरोट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 184 डावांत 38.16 च्या सरासरीने 5 हजार 878 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विराट लवकरच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 6 हजार धावांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.