Most Educated Cricketers: कोणी इंजिनीअर तर कोणी पोस्ट ग्रॅड्युएट, भारतीय संघाचे हे 5 खेळाडू मैदानाप्रमाणे अभ्यासातही होते हुशार

टीम इंडियाच्या बहुतेक क्रिकेटपटूंनी शिक्षणापेक्षाही आपल्या कर्तृत्वाने हे क्षेत्र गाजवले आहे. शिक्षणाने चांगला माणूस घडतो असे म्हणतात, तसेच त्याला रोजगार मिळण्याची देखील उत्तम संधी मिळते. पण दर वेळी हे गरजेचं नाही की खेळात करिअर करणारे खेळाडू अभ्य्सात हुशार नसतातच. भारतीय क्रिकेट टीममध्ये असे काही खेळाडू होते जे मैदानाप्रमाणेच अभ्य्सात देखील तेवढेच हुशार होते.

अनिल कुंबळे आणि मुरली विजय (Photo Credit: Facebook, PTI)

Most Educated Cricketers: तुम्ही ऐकलं असेल आणि वाचलं असेलच की भारतीय क्रिकेटपटूंनी अभ्यास सोडून क्रिकेटला करिअर म्हणून निवडले. टीम इंडियाच्या (Team India) बहुतेक क्रिकेटपटूंनी शिक्षणापेक्षाही आपल्या कर्तृत्वाने हे क्षेत्र गाजवले आहे. शिक्षणाने चांगला माणूस घडतो असे म्हणतात, तसेच त्याला रोजगार मिळण्याची देखील उत्तम संधी मिळते. पण, ज्या वेळी एखादी व्यक्ती शिक्षणात आणि खेळात दोन्हीकडे हुशार असतो तेव्हा खरंच निवड करणे निवड करणे अवघड होते. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचे एक उदाहरण नेहमी ऐकतोच की सचिन 10वी  नापास होता आणि आज त्याच्याच  नावाचा धडा 10वी च्या पुस्तकात आहे. पण दर वेळी हे गरजेचं नाही की खेळात करिअर करणारे खेळाडू अभ्य्सात  हुशार नसतातच. भारतीय क्रिकेट टीममध्ये (Indian Cricket Team) असे काही खेळाडू होते जे मैदानाप्रमाणेच अभ्य्सात देखील तेवढेच हुशार होते. (Cricketers Turned COVID Warriors: हे 5 बडे भारतीय क्रिकेटपटू बनले कोरोना योद्धा; कोणी बेडसाठी सुरु केला WhatsApp ग्रुप तर ‘या’ खेळाडूने राबवली क्राउडफंडिंग मोहीम)

अनिल कुंबळे (Anil Kumble)

‘जम्बो’ म्हणून प्रसिद्ध भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू कुंबळेने बेंगलोरच्या राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॉलेजमधून मॅकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.

अविष्कार साळवी (Avishkar Salvi)

भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हे नाव कदाचितच ऐकले असेल. ग्लेन मॅग्राप्रमाणे गोलंदाजी शैली असलेला मुंबई आणि भारताचा वेगवान गोलंदाज साळवी हा त्याच्या सक्रिय दिवसात बहुधा  सर्वात सुशिक्षित क्रिकेटपटू होता. साळवीने ऍस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. साळवीने  भारताकडून 4 एकदिवसीय सामने खेळले.

राहुल द्रविड (Rahul Dravid)

'द वॉल' आणि 'मिस्टर ट्रस्टेबल' अशी उपाधी मिळवणारे राहुल द्रविडसुद्धा उच्चशिक्षित आहेत. द्रविडने सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यांनी बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये MBA पदवी प्राप्त केली आहे.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय ऑफस्पिनर अश्विन हा क्रिकेटमधील सर्वात शिक्षित खेळाडू आहे. त्याने चेन्नईच्या नामांकित एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून माहिती तंत्रज्ञान विषयात पदवी घेतली आहे. पदवीनंतर त्याने क्रिकेटकडे लक्ष देण्यापूर्वी कॉगनिझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स या नामांकित आयटी कंपनीबरोबर काम केले आहे.

मुरली विजय (Murali Vijay)

भारताचा कसोटी सलामी फलंदाज विजय देखील उच्चशिक्षित आहे. प्रख्यात SRM युनिव्हर्सिटीमधून त्याने अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now