IND vs WI मॅचआधी मोहम्मद शमी वर पत्नी हसीन जहाँ चे नवीन आरोप; म्हणाली TikTok वर बहुतेक स्त्रियांना करतो फॉलो

IND vs WI मॅचआधी मोहम्मद शमी वर पत्नी हसीन जहाँ चे नवीन आरोप. शमी 'टिकटॉक (TikTok)' अकाउंट वर सर्वाधिक महिलांना फॉलो करत असल्याचे आरोप जहाँने म्हटले आहे.

टीम इंडिया (Team India) चा जलद गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) पुन्हा एकदा वादाच्या सापळ्यात अडकला आहे. शमी ची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) ने पुन्हा एकदा शमी वर गंभीर आरोप केलेत. शमी 'टिकटॉक (TikTok)' अकाउंट वर सर्वाधिक महिलांना फॉलो करत असल्याचे आरोप जहाँने म्हटले आहे. याआधी शमीकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा व त्याचे पाकिस्तानी तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीनने केला होता. त्यांच्यातील हा वाद कोर्टात गेला आहे. पत्नीने केलेल्या या आरोपानंतरही बीसीसीआयने शमीला साथ दिली. काही दिवसांसाठी तो मैदानात उतरला नाही पण बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास दाखवला. (IND vs WI: भुवनेश्वर कुमार की मोहम्मद शामी? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने दिले अनपेक्षित पण स्पष्ट उत्तर)

आपल्या फेसबुक अकाउंटवर शमीच्या टिकटॉक अकाउंटचे फोटोज शेअर करताना हसीनने लिहिले, 'शामी अहमद आपल्या टिकटॉकवर 97 व्यक्तींना फॉलो करतो आणि त्यात 90 स्त्रिया आहे. आपली एक मुलगी आहे पण तरीही किती बेशरम आहे.'

दरम्यान, शमी सध्या इंग्लंडमध्ये विश्वकपसाठी वास्तव्य करतोय. विश्वकप मध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात, अफगाणिस्तान विरुद्ध शमी ने हॅट्ट्रिक नोंदवली. शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या कामिगिरीने सर्वांची मनं जिंकली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement