Mohammed Shami VsHasin Jahan: मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, पतीच्या अटक वॉरंट स्थगिती निर्णयास विरोध

मोहम्मद शमी विरोधात स्थानिक न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्याची मागणी करणारी याचिका शमीच्या पत्नीने केली होती.

Mohammed Shami | (PC-Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहॉं (Hasin Jahan) यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या (Calcutta High Court) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागितली आहे. मोहम्मद शमी विरोधात स्थानिक न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्याची मागणी करणारी याचिका शमीच्या पत्नीने केली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावण्यात आल्यानंतर पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमीच्या पत्नीने 28 मार्च 2023 च्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची तिची याचिका फेटाळण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील सत्र न्यायालयाने शमीविरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा खेळाडू मोहम्मद शमीच्या पत्नीने तिचे वकील दीपक प्रकाश, अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड, नचिकेता वाजपेयी आणि दिव्यांगना मलिक वाजपेयी, वकिलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून शमी तिच्याकडे हुंडा मागत असल्याचा आरोप करत आहे. शमीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. खास करुन हे संबंध BCCI दौऱ्यांदरम्यान, BCCI द्वारे प्रदान केलेल्या हॉटेल रूममध्येही ठेवण्यात आल्याचा आरोप शमीच्या पत्नीने केला आहे.

याचिकेनुसार, 29 ऑगस्ट 2019 रोजी अलिपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मोहम्मद शमीने या आदेशाला सत्र न्यायालयासमोर आव्हान दिले. ज्यामध्ये 9 सप्टेंबर 2019 रोजी अटक वॉरंट आणि गुन्हेगारी खटल्याच्या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती दिली.

दरम्यान, शमीच्या पत्नीने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु तिच्या बाजूने कोणताही आदेश मिळू शकला नाही. 28 मार्च 2023 रोजीच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ती म्हणाली की निषेध केलेला आदेश कायद्यात स्पष्टपणे चुकीचा आहे, जो जलद चाचणीच्या तिच्या अधिकाराचे स्पष्ट उल्लंघन आहे. गेल्या 4 वर्षांपासून, खटल्यात प्रगती झाली नाही आणि ती तशीच राहिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.