IND vs SL 1st ODI: मोहम्मद शमीने दासुन शनाकाला केले मंकडिंग, पण कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयाने तो ठरला नाॅट आउट (Watch Video)

पराभवानंतरही श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका खेळपट्टीवर उभा राहिला आणि लढत राहिला. या सामन्यामध्ये त्याने जबरदस्त शतकही झळकावले. या दरम्यान, शनाकाला आपले शतक पुर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकात काही धावांची गरज होती पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दासुन शनाकाला मंकडिंग बाद केले.

IND vs SL 1st ODI: मोहम्मद शमीने दासुन शनाकाला केले मंकडिंग, पण कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयाने तो ठरला नाॅट आउट (Watch Video)
Photo Credit - Twitter

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पराभवानंतरही श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका खेळपट्टीवर उभा राहिला आणि लढत राहिला. या सामन्यामध्ये त्याने जबरदस्त शतकही झळकावले. या दरम्यान, शनाकाला आपले शतक पुर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकात काही धावांची गरज होती पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दासुन शनाकाला मंकडिंग बाद केले. त्यानंतर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आऊट बॅट्समनला नॉन-स्ट्राइकिंग एंडला खेळण्याची परवानगी दिली आणि अंपायरकडून अपील मागे घेतले आणि फलंदाज शनाका सुरक्षित क्रीजवर राहिला. यानंतर शनाकाने आपले शतक पुर्ण केले पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देवु शकला नाही. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळे चाहते त्याचे कौतुक करत आहे.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).