तामिळ भाषेवरून ट्रोल करणाऱ्या चाहत्याची 'Proud Indian' मिताली राज ने केली बोलती बंद, ट्विटरवरून दिले सडेतोड उत्तर
मिताली तामिळनाडूची असून एका क्रिकेट चाहत्याने तिला मातृभाषा न वापरल्याबद्दल ट्रोल केले. या चाहत्यांचे शब्द मितालीला टोचले आणि तिने त्याला प्रत्युत्तर देत त्याची बोलती बंद केली. मितालीने तिच्या ट्विटर पोस्टची सुरूवात तामिळ भाषेत उत्तर दिले.
भारतीय महिला वनडे संघाची (India Women's Cricket Team) कर्णधार मिताली राज (Mithali Raj) ने ट्विटरवरून ट्रोलर्सची शाळाच घेतली आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) महिला संघाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या वनडे मालिकेनंतर मितालीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मिळवलेला विजय कर्णधार म्हणून मितालीचा 100 वा विजय होता. यासह, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील दुसरी महिला कर्णधार ठरली आहे. पण या सर्व प्रकारात मितालीने सोशल मीडियावर तिच्या एका ट्रोलरला चोख प्रत्युत्तर देताना दिसली. मिताली तामिळनाडूची असून एका क्रिकेट चाहत्याने तिला मातृभाषा न वापरल्याबद्दल ट्रोल केले. या चाहत्याने म्हटले की, मिताली बहुधा इंग्रजी, हिंदी किंवा तेलगू भाषेत बोलते आणि मातृभाषेत बोलत नाही. फॅनने ट्विटमध्ये लिहिले आहे, 'तिला तमिळ येत नाही, ती फक्त इंग्रजी, तेलगू आणि हिंदी भाषेत बोलते.' (मिताली राज ने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी सचिन तेंडुलकर यांच्यानंतर बनली दुसरी भारतीय क्रिकेटपटू)
मितालीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने महिला संघाचे अभिनंदन करत ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनीसंघ तसेच 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीबद्दल मितालीचे अभिनंदन केले. पण सुगु नावाच्या एका चाहत्याने मितालीला ट्रोल केले आणि लिहिले की तिला तमिळ माहित नाही. ती केवळ इंग्रजी, हिंदी आणि तेलगूमध्ये बोलू शकते. या चाहत्यांचे शब्द मितालीला टोचले आणि तिने त्याला प्रत्युत्तर देत त्याची बोलती बंद केली. मितालीने तिच्या ट्विटर पोस्टची सुरूवात तामिळ भाषेत उत्तर दिले. नंतर खाली इंग्रजीमध्ये लिहिलेले-"सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. माझ्या प्रिय सुगु, तू माझ्या प्रत्येक पोस्टवर सतत टीका करतोस, मी कसे करावे आणि काय करावे याबद्दल मला दररोज जो सल्ला देतो तोच नेमका मला पुढे नेतो."
'काम डाउन'
इतकेच नाही तर मितालीने टेलर स्विफ्टचे प्रसिद्ध गाणे 'काम डाउन' या चाहत्यासाठी ट्विटरवरून शेअर केले. हे लक्षात असणे गरजेचे आहे की जेव्हा आपण सेलिब्रिटी होतात तेव्हा चाहत्यांसह ट्रोलर्सदेखील तुमच्या सभोवताल असतात. एखादा खेळाडू असो वा कलाकार त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. पण सुगु नावाच्या या ट्रोलरचे शब्द मितालीला सुईसारखे टोचले आणि तिने समोर येऊन त्याची खबर घेतली.