Mithali Raj ने जाहीर केली T20I मधून निवृत्ती; '2021 महिला क्रिकेट विश्वकप' वर करणार लक्ष्य केंद्रीत

भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी T 20 कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हीने क्रिकेटच्या T 20 खेळातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे.

मिताली राज (Photo Credit: ANI)

भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी T 20 कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हीने क्रिकेटच्या T 20 खेळातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. T 20 ला अलविदा केले असले तरीही मिताली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणार आहे. मितालीने भारतासाठी एकूण 88 टी 20 सामने खेळले आहेत. यापैकी 32 सामन्यांमध्ये तिने कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2006 साली भारतीय महिला टीमने जो पहिला टी 20 इंटरनॅशनल सामना खेळला होता त्या सामान्यात मिताली कर्णधार होती. मितालीने 88 टी 20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 2364 धावा केल्या आहेत. टी 20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. यासोबतच इंटरनॅशनल सामन्यांमध्ये भारताकडून पहिल्यांदा 2000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही मितालीने रचला होता.

BCCI Women Tweet 

मितालीच्या संन्यास घेण्याचमागील कारण काय?

मितालीने दिलेल्या माहितीनुसार, तिला टी 20 सामन्यांमधून संन्यास घेत आगामी 2021 मध्ये होणार्‍या वर्ल्डकपवर तिचं लक्ष केंद्रीत करायचं आहे. भारतासाठी विश्वकप जिंकावं हे मितालीचं स्वप्न आहे.त्यासाठी सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी लक्ष केंद्रीत करायचा आहे. बीसीसीआयने मितालीला केलेल्या सहकार्याचे तिने आभार मानले आहेत. तसेच भारताच्या टी 20 संघालाही तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

मिताली राजने 9 मार्च 2019 दिवशी गुवाहटीमध्ये तिचा शेवटचा टी 20 इंटरनॅशनल सामना खेळली होती. इंग्लंड विरूद्ध खेळल्या जाणार्‍या या मॅचमध्ये तिने 32 बॉल मध्ये 30 धावा करत नाबाद राहिली होती.