India Tour of England 2021: मिताली राज आणि विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल, WTC फायनल समवेत जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

विराट आणि संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरोधातआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळणार आहे तर मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात करेल. जाणून घ्या महिला व पुरुष संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक. 

भारताचा इंग्लंड दौरा महिला व पुरुष वेळापत्रक (Photo Credit: Twitter/BCCI)

2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी (England Tour) रवाना झालेला मिताली राज (MithalI Raj) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) भारतीय संघ (Indian Team) साउथॅम्प्टन (Southampton) येथे दाखल झाली आहे. विराट आणि संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरोधातआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल (ICC World Test Championship Final) सामना खेळणार आहे तर मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात करेल. भारत आणि न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा ऐतिहासिक अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लिश टीम विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, तब्बल सात वर्षाच्या ब्रेकनंतर मिताली राज आणि महिला टीम सफेद जर्सी परिधान करेल. (ICC WTC 2021 फायनल सामन्यासाठी ‘विराटसेना’ इंग्लंडमध्ये दाखल, पहा Photos)

भारतीय महिला क्रिकेट संघाने 16 जूनपासून इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळेल त्यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांची वनडे व टी-20 मालिकेत आमनेसामने येतील. पुरुष आणि महिला संघ सध्या साउथॅम्प्टन येथे आयसोलेशनमध्ये आहे. तीन दिवसांच्या कडक क्वारंटाईननंतर संघांना स्टेडियमवर सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे, आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यावर न्यूझीलंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी यापूर्वीच इंग्लंडला रवाना झाला होता. सध्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर यजमान इंग्लंड व किवी संघातील मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे.

भारतीय महिला संघाचे इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

16-19 जून, एकमेव कसोटी सामना, काउंटी मैदान, ब्रिस्टल

27 जून, पहिला वनडे, काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल

30 जून, दूसरा वनडे, कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉन्टन

3 जुलै, तिसरा वनडे, न्यू रोड, वॉरेस्टर

9 जुलै, पहिला टी-20, काउंटी ग्राउंड, नॉर्थहेम्प्टन

11 जुलै, दुसऱ्या टी-20, काउंटी ग्राउंड, होव

14 जुलै, तिसरा टी-20, काउंटी ग्राउंड, चेल्म्सफोर्ड

भारतीय पुरुष संघाचे इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

भारत विरुद्ध न्यूझीलंड, 18-22 जून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, साऊथॅम्प्टन

भारत विरुद्ध इंग्लंड

4-8 ऑगस्ट, पहिला टेस्ट, ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमशायर

12-16 ऑगस्ट, दुसरा टेस्ट, लॉर्ड्स, लंडन

25-29 ऑगस्ट, तिसरा टेस्ट, हेडिंगले, लीड्स

2-6 सप्टेंबर, चौथा टेस्ट, द ओव्हल, लंडन

10-15 सप्टेंबर, पाचवा टेस्ट, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर