MI vs PBKS IPL 2021: अंपायरच्या निर्णयावर Rohit Sharma भडकला, हातवारे करून दिली अशी रिअक्शन, पहा Video 

पंजाब किंग्ज विरोधात नाणेफेक गमावल्यानंतर आणि चेपॉकच्या अवघ्या विकेटवर पहिले फलंदाजी करण्यास आल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला डावातील पाचव्या चेंडूवर मैदानातील अंपायरने चुकीच्या पद्धतीने आउट केले. मैदानावरील अंपायरच्या निर्णयामुळे रोहित खूप निराश झाला होता आणि त्यानंतर अंपायरच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत हातवारे करून तो काहीतरी पुटपुटला.

अंपायरच्या निर्णयावर रोहित शर्माने हातवारे करून दिली अशी रिअक्शन (Photo Credit: Twitter)

MI vs PBKS IPL 2021: गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या आवृत्तीत अद्याप उत्कृष्ट कामगिरी बजावली नसली तरी अद्याप त्यांनी दोन सुपर विजय मिळवले आहेत. रोहित शर्माच्या पलटनने या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला तर बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स सध्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरोधात मोसमातील आपला पाचवा सामना खेळत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर आणि चेपॉकच्या (Chepauk) अवघ्या विकेटवर पहिले फलंदाजी करण्यास आल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) डावातील पाचव्या चेंडूवर मैदानातील अंपायरने चुकीच्या पद्धतीने आउट केले. (IPL 2021: ‘तो भारतीय संघात नसण्यामागे हे एक कारण आहे,’ Sanju Samson याच्या ‘फ्लॉप शो’ वर संतप्त Sunil Gavaskar यांनी दिली मोठी प्रतिक्रिया)

मोईसेस हेनरिक्सने (Moises Henriques) डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितला बाद करण्यासाठी अपील केले ज्याच्यावर अंपायर शमसुद्दीन यांनी बोट उंचावले. तथापि, मैदानावरील अंपायरच्या निर्णयामुळे रोहित खूप निराश झाला होता. मुंबई कर्णधाराने देखील उशीर न करता निर्णयावर रिव्यू घेतला आणि त्यानंतर अंपायरच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत हातवारे करून तो काहीतरी पुटपुटला. रिप्लेमध्ये रोहित स्पष्टपणे नॉटआऊट असल्याचं दिसून आलं आणि मैदानावरील अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. अंपायरने घेतलेला निर्णय विचित्र असल्याचं म्हण्टलं तर चुकीचं ठरणार नाही कारण बॉल रोहितच्या फलंदाजीपासून भरपूर लांब होता. तथापि, डीआरएसचे आभार जे रोहित बाद होताहोता वाचला.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर आयपीएल 2021 मध्ये चेन्नईची खेळपट्टी अजून फलंदाजांची आवहनात्मक ठरत आहे. मुंबई इंडियन्सचा स्फोटक आघाडीक्रम पहिल्या पॉवरप्लेमध्ये केवळ 24 धावाच करू शकला आणि क्विंटन डी कॉकची मोठी विकेट गमावली. आजचा सामना कर्णधार रोहितचा आयपीएलमध्ये 200 वा डाव आहे. आयपीएलमध्ये असा कारनामा करणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे. कर्णधार रोहितने चौकार ठोकत 40 चेंडूत झुंजार अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील हे 40 वं अर्धशतक ठरलं. सुरुवातीला दोन झटपट विकेट गमावल्यावर रोहितने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now