MI vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सूर्यकुमार यादवने पकडला अफलातून 'स्काय' डायव्हिंग कॅच, पाहून ट्रेंट बोल्टसह चाहतेही अवाक (Watch Video)
वेगवान गोलंदाज बोल्टने तिसर्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला बाद केले. 'स्काय' नावाने ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने अफलातून कॅच पकडला आणि गोलंदाजांसमवेत चाहत्यांनाही अवाक केले.
Suryakumar Yadav's 'Sky' Diving Catch: आयपीएलच्या (IPL) मागील दोन मोसमात अन-कॅप्ड क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा दीर्घकाळापासून चाहत्यांचा आवडता राहिला आहे. आणि आज, मुंबईच्या फलंदाजाने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (Kolkata Knight Riders) अफलातून झेल घेतल्यानंतर चाहत्यांनी त्याला टीम इंडियाच्या भूमिकेसाठी पाठिंबा दर्शविला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने अबू धाबी येथे मैदानात उतरताना दोन्ही संघांनी आयपीएल 2020 च्या उत्तरार्धात प्रवेश केला. केकेआरचा नवनियुक्त कर्णधार इयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्यास सांगितले आणि ट्रेंट बोल्टने (Trent Boult) मुंबईला लवकर पहिले यश मिळवून दिले. वेगवान गोलंदाज बोल्टने तिसर्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला बाद केले. 'स्काय' नावाने ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमारने अफलातून कॅच पकडला आणि गोलंदाजांसमवेत चाहत्यांनाही अवाक केले. (MI vs KKR, IPL 2020: इयन मॉर्गन-पॅट कमिन्सच्या जोडीने सावरला KKRचा डाव, मुंबई इंडियन्स समोर विजयासाठी दिले 149 धावांचे लक्ष्य)
बोल्टच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या हेतूने त्रिपाठीने फटकेबाजी प्रयत्न केला. पहिला फटका उत्तम प्रकारे सीमारेषेपार गेला, पण पुढच्या चेंडू तो बाद झाला. बोल्टने टाकलेल्या चेंडूवर त्रिपाठीने पॉईंटच्या दिशेने फटका मारला, पण सूर्यकुमारने हवेत उडी घेत अप्रतिम झेप घेत नाईट रायडर्स फलंदाजाला माघारी पाठवले. चेंडूला वेग असल्याने कॅच पकडला जाईल असं बोल्टलाही वाटलं नव्हतं पण 'स्काय'ने पकडलेला झेल पाहून बोल्टही अवाक झाला. पाहा...
चाहत्यांकडून 'स्काय'साठी आनंद आणि समर्थन दर्शवणारे काही ट्विट पाहा:
टीम इंडियायामध्ये प्रवेश
चमकदार झेल
टॉप-क्लास
मिलियन डॉलरची प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्सविरुद्ध सुरुवातीला डाव गडगडल्यावर अष्टपैलू पॅट कमिन्सच्या नाबाद 53 आणि त्याला कर्णधार इयन मॉर्गनने दिलेली उत्तम साथच्या जोरावर नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. पहिले फलंदाजी करताना कोलकाताची सुरूवात खूपच वाईट झाली होती. पण या दोघांनी 56 चेंडूत नाबाद 87 धावांची भागीदारी केली आणि टीमचा डाव सावरला. राहुल चाहरने सर्वाधिक 2 तर बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि नॅथन कुल्टर-नाईलने 1-1 गडी बाद केले.