MI vs KKR, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
MI vs KKR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 13च्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायर्डस (Kolkata Knight Riders) आमने-सामने येतील. आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL Points Table) मुंबई इंडियन्स 10 गुणांसह दुसऱ्या तर नाईट रायडर्स 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग चार विजय नोंदवले आहेत आणि ब्रेकनंतरही ते विजयरथावर कायम राहण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, मागील सामन्यात केकेआरला (KKR) पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आजच्या सामन्यातून ते विजयी मार्गावर परत येऊ इच्छित असतील. भारतीय वेळेनुसार आज 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने इयन मॉर्गनकडे सोपवली KKR कर्णधारपदाची जबाबदारी, 'हे' सांगितले कारण)
मुंबई इंडियन्स आणि नाईट रायडर्स यांच्यात एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाताने फक्त सहा वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबई इंडियन्सने 20 वेळा विजय मिळविला आहे. या मोसमात दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला. मागील सामन्यातील पराभव विसरून केकेआर आजच्या सामन्यात मुंबईवर प्रभुत्व मिळवण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरतील. दोन्ही टीममधील आजचा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरीकडे, मुंबई आपली विजयी घोडदौड कायम ठेवू पाहत असतील.
पाहा मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.
कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, टॉम बंटन, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, आंद्रे रसेल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, संदीप वारियर, सिद्धेष लाड, निखिल नायक, क्रिस ग्रीन, लोकी फर्गसन, रिंकू सिंह, अली खान, शिवम मावी, मणिमारन सिद्धार्थ.